भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कार्यक्रम

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

गोवा सहकार निबंधक संस्था डिचोलीतर्फे सत्तरी अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी व गोमांचल डेअरी फार्मिंग को.ऑप. सोसायटी कुडणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता रविंद्र भवन साखळी येथे  ६७व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

पणजी : गोवा सहकार निबंधक संस्था डिचोलीतर्फे सत्तरी अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी व गोमांचल डेअरी फार्मिंग को.ऑप. सोसायटी कुडणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता रविंद्र भवन साखळी येथे  ६७व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती राज्य सहकार संस्था डिचोली झोनचे सहाय्यक निबंधक पंकज मराठे यांनी दिली आहे. 

या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून सहकार मंत्री गोविंद गावडे व विशेष अतिथी या नात्याने आरोग्य मंत्री विश्वजित राणे, सभापती राजेश पाटणेकर व साखळी नगरपालिकेचे अध्यक्ष यशवंत मडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सत्तरी अर्बन को.ऑप. के्रडिट सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. यशवंत गांवस, गोमांचल डेअरी फार्मिंग को.ऑप. सोसायटी कुडणेचे अध्यक्ष वल्लभ साळकर व सहकार निबंधक अरविंद खुटकर उपस्थित असतील. 

‘को-ऑपरेटीव्ह फॉर युथ, वुमन अ‍ॅण्ड विकर सेक्शन’ हा सहकार सप्ताह कार्यक्रमाचा विषय असेल. या विषयावर गोवा को ऑपरेटीव्ह मिल्क युनियन लि. कुर्टी, फोंडा चे माजी अध्यक्ष श्रीकांत नाईक हे प्रमुख वक्ते या नात्याने विचार व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या