ICAR निर्माण करणार क्षार-प्रतिरोधक तांदळाच्या जाती

भारतीय कृषी संशोधन परिषद हवामान बदलांवर मात करण्यासाठी संशोधन करत आहे.
ICAR निर्माण करणार क्षार-प्रतिरोधक तांदळाच्या जाती
Indian Council of Agricultural Research to develop salt tolerant rice varietiesDainik Gomantak

पणजी: कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील 'जड्डू बट्टा' (Jaddu Batta) या कडक तांदळाच्या जातीमध्ये पाण्याखाली दीर्घकाळ बुडून राहण्याची क्षमता आहे. ज्यामुळे अन्नसुरक्षेला मदत होणारे हवामान मिळणार आणि प्रतिरोधक पीक विकसित होणार. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) हवामान बदलांवर मात करण्यासाठी क्षार-प्रतिरोधक तांदळाच्या जाती निर्माण करणार आहे.

अत्यंत सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे आधीच क्षारता, पूर आणि तापमानात अनियमित वाढ या समस्यांमुळे पिकांवर घातक परिणाम होत असल्याने, शास्त्रज्ञांसमोर योग्य हवामान-प्रतिरोधक पीक जाती विकसित करण्याचे आव्हान आहे. इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च ( ICAR), जुने गोवा येथिल, कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की, क्षार-प्रतिरोधक तांळाच्या जाती - गोवा धन 1, गोवा धन 2, गोवा धन 3 आणि गोवा धन 4 - मीठ प्रभावित जमिनीवर आधीच प्रमाणित आणि विकसित केल्या आहेत. गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीचा काही भागात या जातीच्या तांदळाची लागवड करण्यात आली आहे.

Indian Council of Agricultural Research to develop salt tolerant rice varieties
गोव्याला पुढे नेण्यासाठी आम आदमीचे सरकार येणे गरजेचे: अरविंद केजरीवाल

“जड्डू बट्टा हे शिमोगा येथील नदीकाठी उगवले जाते आणि 15 दिवस पाण्याखाली राहिल्यानंतरही हे पीक पुन्हा जिवंत होऊ शकते,” असे ICAR-ओल्ड गोवा येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती प्रजनन), के.के. मनोहरा यांनी सांगितले. या वर्षी आलेल्या भीषण पुरामुळे शेतात अनेक दिवस पाणी साचले आणि त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुहाने आणि खाड्यांमधून खारटपणामुळे निर्माण होणारा ताण भाताच्या उत्पादकता आणि उत्पन्नावर परिणाम झाला.

Indian Council of Agricultural Research to develop salt tolerant rice varieties
पृथ्वी तलावरील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती मडगावात

"पीक व्यवस्थापन पद्धतींचे पॅकेज पोषक व्यवस्थापन, क्षार-प्रतिरोधक भाताच्या जाती शेतकऱ्यांच्या शेतात विकसित आणि प्रात्यक्षिक केले गेले आहेत. या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पद्धतींपेक्षा 20% ते 25% पर्यंत जास्त उत्पन्न मिळते.” असे ICAR मधील माती परिक्षक गोपाल महाजन म्हणाले. ही संस्था कृषी संचालनालय आणि प्रगतीशील शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने या चार क्षार-प्रतिरोधक वाणांचे दर्जेदार बियाणे तयार करून खजान भागातील शेतकऱ्यांना पुरवित आहे. “या चार जाती कोरगुट्ट सारख्या स्थानिक पातळीवर पिकवलेल्या वाणांपेक्षा 60% ते 80% जास्त उत्पादन देताता, असे आयसीएआरचे संचालक परवीन कुमार म्हणाले,

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com