Watch Video: गोव्यात मिग-29K फायटर जेटचा अपघात; ICG डॉर्नियर विमानाच्या शोधात

Mig 29k Crash On Goa Coast: भारतीय नौदलाचे मिग 29 के विमान गोव्याच्या समुद्रात कोसळल्यानंतर, भारतीय तटरक्षक दलाचे ICG डॉर्नियर विमानाच्या शोधासाठी पाठवले आहे.
Mig 29k Crash On Goa Coast
Mig 29k Crash On Goa CoastDainik Gomantak

भारतीय नौदलाचे मिग 29 के विमान बुधवारी गोव्याच्या (Goa) किनारपट्टीवर समुद्रात कोसळले. दरम्यान, प्रसंगावधान राखत पायलटने इजेक्ट बटन दाबून समुद्रात उडी मारल्याने तो बचावला. नंतर ICG डॉर्नियर विमानाचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले.

दरम्यान, दोन पाळत ठेवणारी विमाने एका फॉर्मेशन फ्लाइंग इव्हेंटमध्ये भाग घेणार होती. परंतु एसओएस (SOS) वाजल्यानंतर पायलटला मदत करण्यासाठी वळवण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विमानाने सकाळी 8.35 च्या सुमारास उड्डाण केले.

दुसरीकडे, अपघातग्रस्त MiG 29K चा पायलट अपघातस्थळाजवळ दिसला. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, वाचलेल्या पायलटला धीर देण्यासाठी डॉर्नियर विमानांपैकी एक विमान समुद्रसपाटीपासून सुमारे 500 फूट उंचीवर उतरले. त्यानंतर त्याला तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्याचवेळी, नौदलाचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर देखील घटनास्थळी पोहोचले. दोन डॉर्नियर्सने त्यांचे मिशन पूर्ण केल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याची कमांड देण्यात आली होती. त्यानंतर पायलटची सुटका करण्यात आली.

कसे आहे विमान?

मिग 29-के हे एक अत्याधुनिक विमान सर्व प्रकारच्या हवामानात चालते. ते हवेच्या वर्चस्वाच्या विरोधातही उत्तम कामगिरी करू शकते. याचा वेग ध्वनीच्या दुपटीपेक्षा (सुमारे २ हजार किमी प्रतिमास) जास्त आहे. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात 65 हजार फूट उंचीवर ते चालू शकते.

यापूर्वीही दुर्घटना

‌‌‌‌‌2020 साली निशांत सिंग हा नौदलाचा वैमानिक ‘मिग-27 के’ या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाल्यानंतर मरण पावला. त्यापूर्वी 23 फेब्रुवारी 2020 व 16 नोव्हेंबर 2019 रोजी दोन ‘मिग-29 के’ विमाने क्रॅश झाले. 2018 मध्ये भारतीय नौदलाचे ‘मिग-29 के’ पहिल्यांदा क्रॅश झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com