वास्को ट्रेन अपघात: जाको राखे साइयां, मार सके न कोय व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

जाको राखे सईं, मर साने ना कोये...ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकली आहे. पण हा व्हायरल झालेला व्हिडीओ बघून तुम्हाला या म्हणीची प्रचीती झल्याशिवाय राहणार नाही.

वास्को: हल्ली ट्रेनच्या दुर्घटनेबाबत अनेक बातम्या आपल्याला बघायला मिळतात. जाको राखे सईं, मर साने ना कोये...ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकली आहे. पण हा व्हायरल झालेला व्हिडीओ बघून तुम्हाला या म्हणीची प्रचीती झल्याशिवाय राहणार नाही.

लोक हा व्हिडिओ बर्‍याच वेळा पाहत आहेत. हा व्हिडिओ गोव्यातील वास्को स्टेशनचा आहे. एक माणूस धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. पण मग त्याचा पाय घसरलेला पाहून लोकांचा श्वासच थांबतो. पण तिथे एक आरपीएफ जवान धावत येतो. आणि त्या मामसाला बाहेर खेचत त्याचा जीव वाचवितो. हे ट्विट भारतीय रेल्वेने सोशल मीडियावर शेअर केले आहे. "एसडब्ल्यूआर मधील वास्को स्टेशनवर आरपीएफच्या जवानांनी केलेली लाइफ सेव्हिंग अ‍ॅक्ट! वास्को" असे कॅप्शन ही त्या व्हिडिओला दिले आहे.

अमृतमोहोत्सव: नवभारत निर्माणकरीता प्रयत्न व्हावेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

प्रवाशांना रेल्वे प्रशासन वेळोवेळी विनंती करते की चालत्या ट्रेन मध्ये चढू नये किंवा उतरू नये. पण लोकं ऐकत नाही आपल्या जीवाला धोका करून घेतात. गोव्यातील या वास्को स्टेशनवरही हा असाच जीवघेणा प्रकार एका माणसाने केला आहे. आणिआरपीएफ च्या जवानाच्या सतर्कतेमुळे त्या माणसाचे प्राण वाचू शकले आहे.

गोव्यातील त्या दहा आमदारांना अपात्र न ठरवल्यास चोडणकर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार ? 

संबंधित बातम्या