लडाखच्या अतिथंडीचा सामना करण्यासाठी जवानांना मिळणार उबदार निवासस्थाने

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

 पूर्व लडाखमध्ये अतिथंडीचा सामना करतानाही जवानांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने त्यांच्यासाठी निवासव्यवस्था उभी केली आहे. चीनने केलेल्या घुसखोरीमुळे हा भाग प्रसिद्धीस आला असून येथे जवानांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने जवानांचे मनोबल वाढणार आहे. 

लेह :   पूर्व लडाखमध्ये अतिथंडीचा सामना करतानाही जवानांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने त्यांच्यासाठी निवासव्यवस्था उभी केली आहे. चीनने केलेल्या घुसखोरीमुळे हा भाग प्रसिद्धीस आला असून येथे जवानांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने जवानांचे मनोबल वाढणार आहे. 

लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने गेल्या काही वर्षांत जवानांसाठी उपयुक्त सोयी असलेल्या स्मार्ट छावण्यां उभारल्या आहेत. मात्र, आता याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनव पद्धतीने निवासव्यवस्थाही उभारण्यात आली आहे. या निवासस्थानांमध्ये वीज, पाणी, हिटर, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सोयी जवानांना उपलब्ध होणार आहेत. अतिथंड प्रदेशात आघाडीवर तैनात असलेल्या जवानांसाठी ही निवासव्यवस्था उपयुक्त ठरणार आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत वापरता येण्यासारखी यंत्रणाही येथे निर्माण करण्यात आली आहे. पूर्व लडाख भागात तापमान उणे ३० ते ४० अंशांपर्यंत खाली उतरते. नोव्हेंबर महिन्यात ४० फूट उंचीचा बर्फाचा थर साचतो. या कालावधीत रस्त्यांच्या वापरावरही मर्यादा येतात. त्यामुळे नव्या निवासव्यवस्थेचा जवानांना फायदा होणार आहे.

अमेरिकेकडून विशेष कपडे
अतिथंड प्रदेशात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी भारतीय लष्कराने अमेरिकेकडून १५ हजार कपडे खरेदी केले आहेत. चीनबरोबर वाद झाल्यानंतर येथे सैन्य वाढविण्यात आले असून या अतिरिक्त तुकड्यांसाठी विविध प्रकारच्या वस्तू आणि अन्नधान्याचाही साठा केला जात आहे. 

अशी आहे निवासव्यवस्था

  •  हिटर, पाणी आणि विजेची सोय
  •  अधिक जवानांना सामावून घेण्यासाठी बर्थ
  •  आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सोयी

संबंधित बातम्या