Indian Swachhata League : गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; काणकोण, वास्कोला केंद्राचा स्वच्छता पुरस्कार

देशातील सुमारे 1900 शहातून गोव्यातील दोन शहरांनी मारली मुसंडी
Indian Swachhata League
Indian Swachhata LeagueDainik gomantak

केंद्र शासनाने नुकतीच इंडियन स्वच्छता लीग (ISL) उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहिम स्पर्धा घेतली. या स्पर्धेत देशातील 1850 हून अधिक शहरांनी सहभाग नोंदवला. या शहरांमध्ये गोवा राज्यातील दोन शहरांची निवड झाली असल्याची माहिती केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने दिली आहे.

(Indian Swachhata League Canacona Vasco cities won )

Indian Swachhata League
Goa Rabies Vaccination : रेबीज प्रतिबंधासाठी नव्वद हजार श्वानांचे करणार लसीकरण

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातून या स्पर्धेत 1850 हून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. त्यामधून गोव्यातील काणकोण, वास्को या दोन शहरांची निवड झाली आहे. भारतीय स्वच्छता लीगमध्ये सहभाग घेतल्याबद्दल शहरांचे केंद्राने अभिनंदन केले आहे. आणि याचवेळी गोवा राज्यातील दोन शहरांची निवड झाली असल्याची घोषणा केली आहे.

Indian Swachhata League
Goa News: शैक्षणिक क्षेत्रातील 'मांडवी' उपक्रमाचा शानदार शुभारंभ!

या स्पर्धेत निवड झालेल्या शहरांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर, 2022 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे पार पडेल. या पारितोषिक वितरण कार्यक्रमात विजेत्या शहरांचे महापालिका आयुक्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या विशेष सत्कार कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com