गोव्यातील हॉटेल व्यवसायाकडे भारतीय पर्यटकांची पाठ

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

हजारो पर्यटकांनी गोव्यातील कार्निव्हल आणि व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधत गोव्यात गर्दी केली आहे. परंतु, पर्यटकांच्या बदलत्या निवडींमुळे हॉटेलचालक त्रस्त होताना दिसत आहेत.

पणजी : हजारो पर्यटकांनी गोव्यातील कार्निव्हल आणि व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधत गोव्यात गर्दी केली आहे. परंतु, पर्यटकांच्या बदलत्या निवडींमुळे हॉटेलचालक त्रस्त होताना दिसत आहेत. अधिकाअधिक भारतीय पर्यटक जेव्हा कमी अथवा जास्त दिवस घालवण्यासाठी गोव्यात येतात, तेव्हा हॉटेलपेक्षा भाड्याने फ्लॅट्स किंवा घरं घेऊन राहणं अधिक पसंत करतात. खासकरून, समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असणाऱ्या घरांना पसंती असते, जेणेकरून त्यांना सहजपणे समुद्राची झलक बघायला मिळेल.

'गोवा कार्निव्हल’मध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बहुतांश पर्यटकांनी यासाठी गोव्यातल्या आरंबोळला पसंती दिली आहे. फेसबुकवर अशा घरांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न ट्रेंडिंग असतात. या व्यवसायात सक्रिय असलेल्या व्यक्तीने सांगितले की, लॉकडाउननंतर फ्लॅट किंवा घरे निवडणार्‍या पर्यटकांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येतोय. पर्यटक आपल्या कुटुंबासह, घरातील मदतनीस आणि स्वयंपाकी यांसह भाड्याने घेतलेल्या घरात राहतात. हॉटेलपेक्षा ते अशा ठिकाणी राहणे जास्त पसंत करतात.

अफगाणी नागरिकाचे अपहरण करून त्याला पर्वरीत डांबले ;पोलिसांची 48 तासांत कारवाई

जे व्यावसायिक पर्यटकांना त्यांची घरे भाड्याने राहण्यास देतात,ते मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत नाहीत. एका वर्षापूर्वी पर्यटन व्यापार नोंदणी कायद्यातील दुरुस्तीनंतर तयार केलेले नियम अधिसूचित झाल्यावर या बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.फ्लॅट्स किंवा व्हिला मालकांकडून आकारण्यात येणारे दर बहुतेक कमी असल्याने हॉटेलपेक्षा फ्लॅटमध्ये राहणे पर्यटकांसाठी जास्त किफायतशीर ठरत असावे. अशा नोंदणी न केलेल्या व्यावसायिकांमुळे हॉटेल व्यवसायाचे नुकसान होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

संबंधित बातम्या