गोव्यात देशातील पहिले मान्यताप्राप्त सेक्स टॉय स्टोअर, दुकानाच्या भिंतीवर लावले सर्टिफिकेट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

सेक्स टॉय पाश्चात्य देशांमध्ये अधिक प्रचलित आहे, परंतु बदलत्या काळामध्ये समाजाची विचारसरणी बदलत चालली आहे. गोव्यातील कॅलंगुटमध्ये सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सचे दुकान उघडले आहे.

पणजी: भारतात लैंगिक संबंधांबद्दल बोलणे ही एक सामाजिक बंदी मानली जाते. यावर उघडपणे बोलण्यास लोक टाळाटाळ करतात, परंतु जर गोष्ट सेक्स टॉयबद्दल असेल तर त्याबद्दल अजून संकोच बाळगला आहे. हे  सेक्स टॉय पाश्चात्य देशांमध्ये अधिक प्रचलित आहे, परंतु बदलत्या काळामध्ये समाजाची विचारसरणी बदलत चालली आहे. गोव्यातील कॅलंगुटमध्ये सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सचे दुकान उघडले आहे. विशेष म्हणजे सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्टची विक्री करणारी ही भारतातील पहिली मान्यता प्राप्त दुकान आहे. कामा गिजमोस असे या दुकानाचे नाव आहे.  

हे दुकान मेडिकल स्टोअरसारखे दिसते 

मिळालेल्या माहितीमुसार हे दुकान कळंगुट भागात आहे. या दुकानात सेक्स टॉय, कंडोम, स्प्रे, जेल, व्हायब्रेटर्स, पॅकर्स आणि विविध उत्पादने विकली जात आहेत. विशेष म्हणजे हे दुकान एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी किंवा तळघरात नाही तर मोकळ्या रस्त्यावर आहे आणि ते मेडिकल स्टोअरसारखे दिसते आहे. दुकानात कोणत्याही प्रकारची अश्लीलतेची जाहिरात केली जात नाही. दुकानात सर्वाधिक बीडीएसएम सेट्स, मार्शमैलो फ्लेवर्ड, ग्लो इन द डार्क वेगन कंडोम, कॉक रिंग्स, वाइब्रेटर्स आणि रोल प्ले कॉस्ट्यूम्स विकल्या गेले आहेत. 
  
दुकानाच्या भिंतीवरील सर्टिफिकेट

"आम्ही जाणीवपूर्वक हे शॉप तळघरात किंवा अंधाऱ्या ठीकाणी बांधलेले नाही. परदेशात मात्र या उलट परिस्थिती बघायला मिळते. आम्ही हे मेडिकल स्टोअरप्रमाणे बांधले आहे. या मेडिकल ला मान्यता देणारी सर्व प्रमाणपत्रे आम्ही भिंतवर लावली आहेत. कोणत्याही प्रकारचा राजकीय वाद उद्भवू नये म्हणून हे केले गेले आहे," अशी माहीती  शॉपच्या डिझाइनबाबत दुकानाचे सहसंस्थापक नीरव मेहता यांनी दिली आहे.

नवीन उत्पादनांचा पुरवठा करणार

भारतात अश्लीलतेविरूद्ध कठोर कायदे आहेत. हे लक्षात घेता येथे सेक्स टॉयचा व्यवसाय करणे अशक्य आहे. "भारतात अशा दुकानांविषयी कायदा स्पष्ट नाही परंतु आपण सेक्ट प्रोडक्ट्स विकू शकतो जो पर्यंत ते  अश्लील असत नाही शकता. आम्ही जाणीवपूर्वक खेळणी आणि उत्पादने निवडली ज्यांचे पॅकेजिंग अश्लीलतेचे प्रतिबिंबित करीत नाही आणि त्यातुन कोणत्याही प्रकारे महिलांचा अपमान  होणार नाहीत याचे भान आम्ही ठेवले आहे. असे केल्याने अश्लीलतेच्या कायद्याचे उल्लंघन झाले नाही, असे त्यानी सांगितले. या स्टोअरचे मालक आपल्या दुकानात उत्पादन वाढवण्याच्या आणि नवीन उत्पादने आणण्याची तयारी करत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KamaGizmos (@kamagizmos)

संबंधित बातम्या