गोव्यात सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले सेक्स टॉय स्टोअर बंद

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

भारतातील पहिले  सेक्स टॉय स्टोअर फेब्रुवारीमध्ये गोवा मधील कलंगुटमध्ये ओपन करण्यात आले होते. परंतु या शॉपला  एका महिन्याच्या आत कंपनीकडे परवाना नसल्याने बंद करण्यास सांगण्यात आले.

पणजी: भारतातील पहिले  सेक्स टॉय स्टोअर फेब्रुवारीमध्ये गोवा मधील कलंगुटमध्ये ओपन करण्यात आले होते. मागिल काही दिवसात या शॉप चा भरपूर प्रमाणात  प्रचार झाला. परंतु या शॉपला  एका महिन्याच्या आत कंपनीकडे परवाना नसल्याने बंद करण्यास सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील पंचायतीने परवान्याअभावी स्टोअरचे कामकाज बंद करण्यास सांगितले. तसेच लोकांनी स्टोअरबाबत काही समस्या किंवा तक्रारी सुद्धा केल्या.

कामाकार्ट आणि गिझ्मोसवाला यांच्या भागीदारीत कामा गिझ्मोस, सेक्स टॉय आणि वेलनेस स्टोअर सुरू केले होते. कामाकार्ट हे दक्षिण भारतात लैंगिक कल्याण स्टोअर्सची साखळी चालवित आहेत, तर गिझमोस्वाला हे मुंबईबाहेरील एक ऑनलाइन सेक्स टॉय स्टोअर आहे.

“आमची ट्रेड परवाना अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. पण आम्हाला परिसरातीन पंचायतीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की शनिवारी (13 मार्च) काही दिवस दुकान उघडू नका म्हणून आम्ही ते बंद ठेवले. आमच्यावर स्थानिक प्राधिकरणाकडून खूप दबाव होता. आम्ही गोव्याचे नसल्याने आम्हाला स्थानिक पातळीवर लक्ष्य करण्यात आले," असे कामकार्टचे मुख्य कार्यकारी प्रवीण गणेश यांनी सांगितले.

गोव्यात देशातील पहिले मान्यताप्राप्त सेक्स टॉय स्टोअर, दुकानाच्या भिंतीवर लावले सर्टिफिकेट

संबंधित बातम्या