कचरा व्यवस्थापनासाठी यिम्बी हा एक उपाय

India's first waste management consumer brand Yimbi
India's first waste management consumer brand Yimbi

पणजी : अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षण हा महत्त्वाचा विषय झाला आहे, त्यामुळे आणि पर्यावरण पूरक,टिकाऊ आणि जैव विघटनशील उत्पादने बनवण्यात यावीत, अथवा अशीच उत्पादने वापरण्यासाठीचा हट्ट धरला जात आहे. भारतभर कचऱ्याचा वाढत प्रश्न लक्षात घेऊन गोव्यातील गौरव पोकळे यांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. भारतातील पहिले कचरा व्यवस्थापन कंज्युमर ब्रँड असणारे यिम्बी म्हणजेच येस इन माय बॅक यार्ड असा आहे. यिम्बीच्या माध्यमातून घनकचरा असो वा द्रव कचरा व्यवस्थापनामधील विविध उत्पादने व सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. 


कचऱ्याची वाढती समस्या लक्षात घेऊन यिम्बीच्या माध्यमातून कचऱ्याच्यातील प्लास्टिकसारख्या गोष्टींचा पुनर्वापर करून वस्तूंची निर्मिती केली जाते. ज्यामुळे कचरा निर्मितीच्या समस्येला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. इनोवेटीवा वेस्ट एड अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या गोवन स्टार्ट अप कंपनीने हा ब्रँड आणला आहे. याविषयी बोलताना गौरव पोकळे म्हणाले की, भारतातील पाहिले कचरा व्यवस्थापन ग्राहक केंद्र झाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आशा आहे .की या उपक्रमाद्वारे आम्ही जागृती निर्माण करण्यासोबतच आमची शाश्वततेविषयी असणारी कल्पना संपूर्ण देशभरात राबविणार आहोत.

आपल्या देशात वाढ होत असून आपण एक देश म्हणून एका चांगल्या आणि आत्मनिर्भर भविष्याकडे जात आहोत.  इनोवेटीवा वेस्ट एड अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही एज ध्येयवादी कचरा व्यवस्थापन कंपनी असून घन आणि द्रवकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्पक आणि प्रभावशाली तोडगे पुरविते. या कंपनीकडे कचरा गोळा करण्यापासून ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची सर्व सामग्री आहे,या प्रक्रियेमुळे ग्राहकांचा वेळ वाचतो त्यामुळे त्यांना त्यांची सेवा मिळवण्यासाठी इतर अनेक पुरवठादारांसोबत संपर्क साधावा लागत नाही. तुमच्या सर्व कचऱ्याचे एकाच पुरवठादाराकडून विल्हेवाट लावली जात असल्याने पैशाची बचत होऊन तुम्हाला कमी दरात ही सेवा मिळते.

तुमच्या रिसायकल केलेल्या कचऱ्यासंबंधित सर्व आकडेवारीचे विश्लेषण हे सहज आणि सोप्या पद्धतीने एकच ठिकाणी तयार केले जाते. विविध पर्यावरण पूरक साधने एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी इतर कोणत्याही दुकानासारखेच हे देखील एक दुकान आहे.येथे तुम्हाला बागासी क्रोकरी, टूथब्रश, लाकडी कटलरी, पाण्याच्या बाटल्या, कॉटनच्या पिशव्या मिळतात त्याशिवाय येथे कंपोस्टर आणि कंपोस्ट उत्पादनेही उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com