'जागतिक पातळीवर भारताचे नाव गांधींमुळे पोहोचले'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

महात्मा गांधी यांनी इतरांचे दुःख हे आपलेच दुःख आहे हे समजून घेण्याची ताकद समाजाला दिली.

पणजी: महात्मा गांधी यांनी इतरांचे दुःख हे आपलेच दुःख आहे हे समजून घेण्याची ताकद समाजाला दिली. सर्वसामान्य माणूसही आपल्या ताकदीनुसार समाजासाठी बरेच काही करू शकतो ही दृष्टी गांधींनी दिली, असे उद्गार काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी आज येथे काढले. काँग्रेस भवनात महात्मा गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, खजिनदार शंभू भाऊ बांदेकर व इतर नेते उपस्थित होते. खलप म्हणाले गांधीनी कोणतेही शस्त्र हाती न घेता कसे लढावे याचा धडा दिला.

गोव्यासह अन्य राज्यांचे न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरू

जागतिक पातळीवर भारताचे नाव गांधींमुळे पोहोचले आहे. गांधी माहिती नाहीत असा जगातील एकही देश नसेल. गांधी विचारांमध्ये सर्वांना सोबत एकत्र घेऊन जाण्याची ताकद आहे.  गांधी विचारांचा तिटकारा काहीजणांना वाटत आलेला आहे ,तरीही गांधी विचारांचे महत्त्व कमी होत नाही. महात्मा गांधी या देशात जन्मले त्यानी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी कामगिरी बजावली याची दखल पूर्ण विश्वाने घेतलेली आहे.

संबंधित बातम्या