Babu Ajgaonkar: आजगावकर पेडणेतून निवडणूक लढवणार नाहीत?

मडगावातून (Margao) निवडणूक लढण्याची शक्यता
Babu Ajgaonkar
Babu AjgaonkarDainik Gomantak

Babu Ajgaonkar: गोव्यातील राजकारण संपूर्ण देशभर गाजत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. यासाठी एकीकडे पक्ष आणि राजकीय नेते जोरदार तयारी करत आहेत तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) तोंडावर असताना अजूनही अनेक नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत.

Babu Ajgaonkar
Sanjay Raut: कोरोना वाढत असताना केजरीवालांना गोव्यात जायची काय गरज?

गोव्याच्या राजकरणार क्षणाक्षणाला अनेक बदल होत आहेत. यातच गोव्याचे उप-मुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर हे पेडण्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे म्हंटले जात आहे. बाबू आजगावकर ह्यांनी पेडणेतून निवडणूक लढवली होती. पेडणे मतदारसंघासाठी (Pernem Constituency) त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. सध्याच्या निवडणुकीसाठी ते पेडण्यातून लढणार होते. पण अचानक त्यांच्याकडून पेडण्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अपरिहार्यतेमुळे आपण वेगळा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर 22 वर्षे साथ दिल्याबद्दल त्यांनी पेडणेवासीयांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे आजगावकर भाजपच्या उमेदवारीवर मडगावातून (Margao) लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप (BJP) पक्षातर्फे 19 जानेवारीला पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर आपल्याला भाजप पक्षाचा आणि अजेंडा कळू शकेल. आजगावकर या निवडणुकीत खरोखरच मडगावातून निवडणूक लढवणार का हे वेळ आल्यावरच जनतेला कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com