गोव्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांची बदली
Indradev Shukla New DGP of Goa Police Dainik Gomantak

गोव्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांची बदली

मुकेश कुमार मीणा यांची दिल्ली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी इंद्रदेव शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे.

गोव्याचे पोलिस महासंचालक (Goa Director General of Police) मुकेश कुमार मीणा (Mukesh Kumar Meena) यांची दिल्ली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी यापूर्वी गोव्यात अनेक वर्षे सेवा केलेले इंद्रदेव शुक्ला (Indradev Shukla) यांची नियुक्ती झाली आहे.(Indradev Shukla New DGP of Goa Police)

इंद्रदेव शुक्ला हे 1955 अग्मूट केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. गोव्यात त्यांची उपअधीक्षक म्हणून तर त्यापूर्वी प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांना पोलिस अधीक्षकपदी बढती मिळाली होती. त्यांनी बराच काळ दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक म्हणून काम सांभाळले आहे. पोलिस महानिरीक्षक असताना त्यांनी गोव्यामध्ये बदलीसाठी प्रयत्न केले होते मात्र शक्य झाले नाही. पण आता मात्र ते पुन्हा गोव्यात पोलिस महासंचालक म्हणून येत आहेत.

Indradev Shukla New DGP of Goa Police
गोव्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत दर आठवड्याला बाल अत्याचाराच्या 6 घटनांची नोंद

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com