महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण: काँग्रेस

ॲड. रमाकांत खलप : काँग्रेस पक्षातर्फे वाळपई शहरात जनजागृती
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण: काँग्रेस
Inflation makes life difficult for the common manDainik Gomantak

वाळपई : वाळपई (Valpoi) मतदारसंघात (Constituency) काल शनिवारी दिवसभर काँग्रेसतर्फे महागाई विरोधात जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. शासनाने सर्वसामान्यांना जगणे कठिण झालेअसून शासनाला त्याचा जाब द्यावा लागेल. जनतेने या सरकाराला त्यांची जागा दाखवावी, असेही रमाकांत खलप यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते ॲड. रमाकांत खलप, वाळपई गट समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मानकर, पदाधिकारी रणजीत राणे, ॲड. भालचंद्र मयेकर, गनी बेग, परिणिता राणे, रोशन देसाई, विश्वेश प्रभू आदींची उपस्थिती होती.

Inflation makes life difficult for the common man
राज्यात महिन्याला 41 कुटुंबे होत आहेत उद्ध्वस्त

ॲड. रमाकांत खलप यांनी वाळपई बाजारात फिरून दुकान व्यावसायिकांशी संवाद साधला. पत्रके वितरीत केली. सध्या केंद्र सरकारने महागाई करून सामान्य जनतेचे कंबरडे कसे मोडले, याचे विवेचन नागरिकांना केले. अनेक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

हरिश्चंद्र मानकर म्हणाले, महागाई करून सरकारने गरिबांना संकटात ओढले आहे. हे जगणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. म्हणूनच लोकांनी आत्ताच सावध होऊन सरकारला याविषयी जाब विचारला पाहिजे. काँग्रेस आता याबाबत आवाज उठविणार आहे. यावेळी वाळपई मतदार संघात वाळपई नगरपालिका क्षेत्र, नगरगाव पंचायत, सावर्डे पंचायत, खोतोडा पंचायत, गुळेली पंचायत व उसगाव पंचायत भागात महागाई विरोधात कार्यक्रम राबविणात आला आहे. विश्वेश प्रभू, भालचंद्र मयेकर, गनी बेग यांनी विचार मांडून भाजप सरकार विरोधात नाराजी व्यक्त करीत चीड व्यक्त केली.

भाजप सरकारकडून जनतेची लूट

भाजप सरकारने (BJP) लोकांना फसवून अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेची लूट चालविली आहे. त्यात सामान्य माणूस भरडला जातो आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाण्यायोगी वस्तू, धान्ये यांच्या किंमती गगनाला गेल्या आहेत. देशात महागाईचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष महागाई विरोधात आता आवाज उठविणार असून लोकांशी या कार्यक्रमा दरम्यान संवाद साधणार आहे, असे रणजीत राणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com