महागाईत कांद्याची ऑनलाईन विक्री!

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

कांद्याचे वाढलेले दर प्रत्येकाला रडवत आहेत. बाजारात ज्या पद्धतीने एक दोन रुपये कांदा कमी दरात मिळावा, म्हणून चढाओढ करताना आणि वाद घालताना दिसून येत आहेत. तसेच कांद्याचा ऑनलाईन दार कमी असल्याने लोक येथून कांदा मोठ्या प्रमाणात ऑर्डर केला जाताना पहायला मिळत आहे. 

पणजी :  कांद्याचे वाढलेले दर प्रत्येकाला रडवत आहेत. बाजारात ज्या पद्धतीने एक दोन रुपये कांदा कमी दरात मिळावा, म्हणून चढाओढ करताना आणि वाद घालताना दिसून येत आहेत. तसेच कांद्याचा ऑनलाईन दार कमी असल्याने लोक येथून कांदा मोठ्या प्रमाणात ऑर्डर केला जाताना पहायला मिळत आहे. 

मुळात कोरोनामुळे देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना साहित्य ऑनलाईन ऑर्डर करण्याची लागलेली सवय कांदा खरेदीच्या बाबतीतही फायद्याची ठरत असल्याची माहिती मिळाली. 
बिग बास्केट नावाच्या शॉपिंग साईटवर कांद्याचे वेगवेगळे दर आहेत. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला कांदा येथे १२५ रु प्रति किलो दरात उपलब्ध आहे. तर सांभार कांदा नावाचा कांदा केवळ ३७.२५ रु प्रति किलो दरात उपलब्ध आहे. ५ किलो कांद्याचा संपूर्ण दर या साईटवर केवळ ४१० रु इतका दर्शविला जात आहे. तर लहान आकाराचा कांदा केवळ ८० रु प्रति किलो दरात उपलब्ध आहे. 

बटाटा, कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी एक किलो अशा वजनात एकत्रितपणे घेतल्यास १६७ रुपयांना उपलब्ध आहे. 
अमेझॉनच्या बाबतीतही कांदा भाव खाऊन जात आहे. बिग बझार फ्रेश कांडा १०९ रु प्रति किलो दरात उपलब्ध आहे, येथे आश्चर्याची बाब म्हणजे तळलेला कांदाही उपलब्ध आहे आणि कंपनीनुसार कमी अधिक दरात असणाऱ्या या कांद्याचा भाव सरासरी एक किलोला १५० रु इतका आहे. 

दरम्यान, फ्लिपकार्टसारख्या वेबसाईटवर कांद्याचा दर केवळ १६ रुपये किलो दिसत असला तरी येथे कांदा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
ज्यांच्याकडे अधिक पैसे देऊन चांगल्या दर्जाचा कांदा उपलब्धच होत नाही, त्यांनी एकदा ऑनलाईन कांदा शॉपिंग नक्की ट्राय करायला हवी.

संबंधित बातम्या