Anjuna Crime: मद्यधुंद बिहारींच्‍या मारहाणीतील जखमीचा गोमेकॉत मृत्‍यू

बेशुद्ध होईपर्यंत केलेली मारहाण
Anjuna Assault Case
Anjuna Assault CaseDainik Gomantak

Anjuna Crime: बार्देशातील आसगाव येथे एका बांधकाम साईटवर मद्यधुंद बिहारी मजुरांकडून सोमवारी मध्यरात्री झालेल्या मारहाणीत जबर जखमी झालेला वासीम शेख (वडाळा-मुंबई) याचा आज बुधवारी पहाटे गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मारहाणीचा हा प्रकार मंगळवारी घडला होता. या प्रकरणी पाच बिहारी कामगारांना हणजूण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Anjuna Assault Case
Mahadayi Water Dispute : म्‍हादईप्रश्‍‍नी 'या' तारखेला मुख्यमंत्र्यांच्या गावात आंदोलन

हणजूण पोलिसांच्या माहितीनुसार, बायरो-आल्तो, आसगाव येथे एका नवीन बंगल्याच्या बांधकामावर वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी वडाळा-मुंबई येथून सोहेल शेख व वासीम शेख आले होते. बिहारी मजुरांचा एक गट तेथे आधीपासूनच कार्यरत होता. सोमवारी रात्री उशिरा संशयित दीपक पासवान, रोशन पासवान, दिश्कांत पासवान, किशन पासवान व सुमीत कुमार शाह (सर्वजण मूळ बेगुसराय-बिहार) यांनी दारुच्या नशेत सोहेल व वासीम शेख राहत असलेल्या जागेत उलट्या केल्‍या. त्यावरून वाद सुरू झाला आणि प्रकरण हातघाईवर आले. दारुच्या नशेत असलेल्या बिहारी कामगारांनी शेख बंधूंवर हल्ला केला.

Anjuna Assault Case
CM Fellowship: अ‍ॅमँडा मीनेझिसला सीएम फेलोशिप; अमेरिकेतील टोलेडो विद्यापीठात 'या' विषयात करणार संशोधन

अकस्‍मात झालेल्‍या या हल्‍ल्‍यातून सोहेल शेख याने कशीबशी सुटका करून घेऊन तेथून पळ काढला. मात्र वासीम शेख या मारहाणीत जबर जखमी झाला होता. त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाली होती. हणजूण पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी उपनिरीक्षक धीरज देविदास तसेच पोलिस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी वासीम शेख याला म्हापसा जिल्हा इस्पितळ व तेथून नंतर गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले. शिवाय पाचही संशयित मजुरांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com