कोलवाळ कारागृहातील कैदी कोविडमुक्त; 334 कैद्यांचे लसीकरण

कोलवाळ कारागृहातील कैदी कोविडमुक्त; 334 कैद्यांचे लसीकरण
Colvale jail covid19.jpg

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात (Colvale Central Jail) कोरोना संसर्गाने कैद्यांत थैमान मांडल्याने भयभीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही स्थिती आता नियंत्रणात आले आहे. कैदी व इतर कर्मचारी मिळून 69 जणांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यातून 66 कोविडमुक्त झाले आहेत. संसर्ग झालेले 32 कैदी कोविडमुक्त (Covid-19) झाले आहेत. कारागृहातील 334 कैद्यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रभारी कारागृह महानिरीक्षक श्रीनेत कोठवाले यांनी दिली. (Inmates at Kolwal Prison who were infected with the corona virus recovered)

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना तो कोलवाळ कारागृहात पोहचला होता. कारागृहात असलेल्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टरालाच संसर्ग झाल्याने त्याचा प्रसार कारागृहातील कैदी, प्रशासकीय कर्मचारी व तुरुंगरक्षक तसेच काही पोलिस सुरक्षारक्षकाना झाला होता. या संसर्गामुळे कारागृहातील अनेकांचे धाबे दणाणले होते. कारागृहाच्या प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आतमध्येच कोरोना संसर्ग झालेल्यांना वेगळ्या खोलीमध्ये अलगीकरण करून ठेवले व त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. ‘कोविड-19’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले त्याचा परिणाम हा संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील 334 कैद्यांना लसीकरण करण्यात आले आहेत. त्यापैकी 261 जण 18 ते 44 वयोगटातील तर 73 जण 46 वर्षावरील आहेत. 16  कर्मचाऱ्यांपैकी दोघेजण व 3 जीएचआरडीसी सुरक्षापैकी एकजण कोरोना संसर्ग सक्रीय आहे. या कारागृहात पुन्हा संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर ‘कोविड-19’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. प्रत्येक कैद्याला तसेच आतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंडाला मास्क लावण्याबरोबरच एकत्रित येण्यास दिले जात नाही. सध्या कारागृहात एकूण 443 कैदी आहेत. त्यामध्ये 393 पुरुष कच्चे कैदी व 50 जणांना शिक्षा झालेले आहेत. तीन महिलांना शिक्षा तर 14 महिला कच्चे कैदी आहेत. 

चोविस डॉक्टराची गरज... 
या कारागृहात आरोग्य केंद्र असून दिवसभर तेथे डॉक्टराची सोय असते मात्र संध्याकाळी 5 वाजल्यानंतर या केंद्रात डॉक्टरची सोय नाही. त्यामुळे एखादा कैदी आजारी झाल्यास त्याला तपासण्यासाठी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात न्यावे लागते. त्यामुळे केंद्रात चोविस तास कोरोना महामारीच्या काळात डॉक्टराची नेमणूक करण्याची गरज आहे, अशी माहिती काही कैद्यांनी दिली. 

‘कोविड’मुक्तीच्या वाटेवर तीन कर्मचारी 
कारागृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 69 जणांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यातील एका कैद्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या मृत्यूमागील कारण अजून उघड झाले नाही. कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये 32 कैदी, 18 तुरंगरक्षक व प्रशासकीय कर्मचारी, 15 आयआरबी पोलिस तर 4  ‘जीएचआरडीसी’ सुरक्षारक्षक यांचा समावेश होता. सर्व कैदी कोविडमुक्त तर 3 कर्मचारी अजून कोरोना संसर्गाचे सक्रीय आहेत. परंतु ते कोविडमुक्तीच्या वाटेवर आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com