फाईल गायबप्रकरणी चौकशी करा, माहिती आयोगाचा आदेश 

विलास महाडिक
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

रॉय डिसोझा यांनी विभागाकडे माहिती हक्क कायद्याखाली काही दस्ताऐवज व फाईल्सची पाहणी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र संबंधित फाईलच गायब असल्याचे उत्तर त्यांना देण्यात आल्याने त्याची तक्रार त्यांनी आयोगाकडे केली होती. 

पणजी

दक्षता खात्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून गहाळ झालेल्या फाईल्प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश माहिती आयोगाने दक्षता सचिवांना दिला आहे. रॉय डिसोझा यांनी विभागाकडे माहिती हक्क कायद्याखाली काही दस्ताऐवज व फाईल्सची पाहणी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र संबंधित फाईलच गायब असल्याचे उत्तर त्यांना देण्यात आल्याने त्याची तक्रार त्यांनी आयोगाकडे केली होती. 
रॉय डिसोझा यांनी २०१४ साली आल्तिनो येथील गोवा वास्तुशिल्प शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या विभागाकडे त्यांनी ३१ जुलै २०१९ रोजी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली होती. संबंधित माहिती मागितली होती. प्रकरणाचे तपासकाम सुरू असल्याने माहिती देता येत नाही. तपासात अडचणी येऊ शकतात, असे उत्तर देण्यात आले होते. डिसोझा यांनी दक्षता खात्याच्या अपेलेट अधिकारिणीकडे २३ सप्टेंबर २०१९ रोजी केल्यावर त्यांनी विभागाच्या माहिती अधिकाऱ्यांनी डिसोझा यांना १५ दिवसांत माहिती देण्याचा आदेश २५ ऑक्टोबर २०१९ ला दिला होता. या आदेशानुसार माहिती अधिकाऱ्यांनी डिसोझा यांना काही फाईल्स तपासणीसाठी दिल्या मात्र ज्या फाईल्सची आवश्‍यकता होती ती फाईल सापडत नव्हती. त्यांनी मागितलेल्या फाईल्सऐवजी वेगळ्याच फाईल्स तपासणीस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी या अधिकाऱ्याने फाईल सापडत नसल्याचे कळविले. त्यामुळे डिसोझा यांनी माहिती आयोगाकडे या अधिकाऱ्याविरुद्ध आव्हान दिले होते. 

संबंधित बातम्या