गोवा पोलिस आर्थिक गुन्हे विभागाकडून जीत आरोलकर यांची चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने काल मगो पक्षाचे नेते तथा उदरगत संस्थेचे अध्यक्ष जीत आरोलकर यांची सुमारे पाच तास चौकशी केली.

पेडणे :   पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने काल मगो पक्षाचे नेते तथा उदरगत संस्थेचे अध्यक्ष जीत आरोलकर यांची सुमारे पाच तास चौकशी केली. याबाबत आरोलकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पेडणे व मांद्रेतील आमदारांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे वैफल्यातून त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग करून मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चौकशीच्या नावाखाली आपल्याला फक्त बसवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

 

गोव्याला अन्नधान्य चळवळीत मदत करण्यासाठी  दुप्पट रेल्वे ट्रॅकला पाठींबा: एमजीपी

आरोलकर म्हणाले की, मतदारांकडून आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तिन्ही मतदारसंघात मगोच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. त्यामुळे दोघाही आमदारांसमोर त्यांच्या प्रतिष्ठेचा व राजकीय भवितव्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. माझ्याविरुध्द एक तक्रार आहे. पण चौकशीची ही वेळ निश्‍चित नाही. आर्थिक गुन्हे विभागाने नोटीस घेऊन काल रात्री पेडणे पोलिस येतात काय आणि मला बोलावून घेतात काय हे मजेशीर आहे. काही दिवसांपूर्वी माझा मांद्रे येथे मगो पक्षात प्रवेश होता. त्यावेळी पोलिसांचा वापर करून या लोकांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काल निवडणूक प्रचार संपला असताना हरमलमध्ये भाजपची जाहीर सभा घेतली. या सभेला भाजपचे अध्यक्ष तानावडे उपस्थित होते. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार चांगला धडा शिकवतील, असा विश्‍वास जीत आरोलकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या प्रकाराबद्दल आपणाला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. आरोलकर निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची काही गरज नाही, असे ते म्हणाले. आमदार दयानंद सोपटे म्हणाले, जीत आरोलकर यांच्या चौकशी प्रकरणात माझे काहीही देणे-घेणे नाही असे सांगितले आहे.

 

अधिक वाचा :

चिखलीत रात्री अचानक झालेल्या वायूगळतीमुळे भीतीचे वातावरण 

 

 

 

संबंधित बातम्या