तणावाखालील विद्यार्थ्यांची पाहणी करा; उच्च शिक्षण खात्याचे आदेश

दक्षिण गोव्यातील ‘ते’ सरकारी महाविद्यालय चर्चेत
Students
Students Dainik Gomantak

मडगाव: दक्षिण गोव्यातील एका सरकारी महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वृत्ताची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने ‘त्या’ महाविद्यालयात समुपदेशकांचे पथक पाठवून चौकशी करण्याचे ठरवले आहे. (Inspect students under stress in Goa orders Department of Higher Education)

Students
इंधन दरवाढीविरोधात आप नेत्यांचे मडगाव नगरपालिकेसमोर आंदोलन

या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर याच विद्यार्थिनीच्या वर्गातील अन्य दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे वृत्त आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी महाविद्यालयातच एक विद्यार्थिनी विचित्र वागू लागू लागल्याने तिला ॲम्बुलन्स बोलावून इस्पितळात दाखल करावे लागले होते. या घटनांमुळे हे महाविद्यालय सध्या चर्चेत आले आहे.

हे विद्यार्थी कदाचित मानसिक तणावाखाली असल्याने असे प्रकार घडले असावेत, अशी चर्चा आहे. मात्र यासंबंधी पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही.

Students
नागवा, पर्रामध्ये अधिकाऱ्यांकडून पदांचा गैरवापर

हा लैंगिक शोषणाचा प्रकार तर नव्हे ना, याची खात्री करून घेण्यासाठी लैंगिक शोषण प्रतिबंध समितीच्या सदस्य आवदा व्हिएगस यांनी आज या महाविद्यालयाला भेट दिली. मात्र आपल्याला या शक्यतेत काही तथ्य आढळून आले नाही असे त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

सर्व गोष्टींची दखल घेऊन आज उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत नेमलेल्या समुपदेशकांची एक तातडीची बैठक बोलावली. ‘त्या’ महाविद्यालयात जाऊन चौकशी करून सत्यता अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले असून, हे पथक लवकरच या महाविद्यालयाला भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com