Goa Agriculture : कृषी महाविद्यालयासाठी एला फार्म येथे मुख्यमंत्र्यांकडून जागेची पाहणी

महाविद्यालयाचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे दोन वर्षे लागू शकतात, अशी माहिती कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी यावेळी दिली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Agriculture : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्‍यात कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जुने गोवे येथील एला फार्म येथे कृषी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसह नवीन कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली.

या महाविद्यालयाचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे दोन वर्षे लागू शकतात, अशी माहिती कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी यावेळी दिली. या शैक्षणिक वर्षापासून कृषी विषयातील प्रथम वर्षाचा बीएचा अभ्यासक्रम सुरू होणार असून हे महाविद्यालय जुने गोवे येथील एला फार्म येथील विद्यमान प्रशिक्षण केंद्रात सुरू केले जाणार आहे. सध्या याठिकाणी एक सभागृह आणि प्रयोगशाळा आहे. नवीन इमारत तयार होईपर्यंत येथे वर्ग आणि प्रॅक्टिकल होईल, असे अल्फोन्सो यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Ganesh Chaturthi : आतुरता बाप्पाच्या आगमनाची; घुमट, समेळाचा घुमतोय नाद

वॉक-इन मुलाखती शनिवारी

उच्च शिक्षण संचालनालयाच्या पोर्टलवर कृषी महाविद्यालयासाठी आधीच ऑनलाईन प्रवेश सुरू केले आहेत. पहिल्या बॅचमध्ये किमान 60 विद्यार्थ्यांची नोंद करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी गोमंतकीय प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार असून याच्‍या वॉक-इन मुलाखती शनिवारी होणार आहेत.

सरकारने गोवा विद्यापीठांतर्गत राज्‍यात कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. गोव्यातील अनेक विद्यार्थी देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये कृषी, फलोत्पादन, वनीकरण आणि इतर कृषी-संबंधित विषयांचे शिक्षण घेतात. या पार्श्वभूमीवर गोवा विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com