पाळोळे किनाऱ्यावरील प्रसाधनगृहाच्या कामाची उपसभापतींकडून पाहणी

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

पाळोळे किनाऱ्यावर सुलभ शौचालय आहे. परंतु पर्यटकांसाठी अद्यावत प्रसाधनगृह व कपडे बदलण्यासाठी कक्ष नाही.

काणकोण, 

काणकोणमधील पाळोळे किनाऱ्यावर बांधण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहाची पहाणी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्षा नितू समीर देसाई, पालिका अभियंता
विनोद ठाकरकर, नगरसेवक दिवाकर पागी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन खात्यातर्फे या सुलभ शौचालय व प्रसाधनगृहाची बांधणी करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी या प्रसाधनगृहाची उभारणी पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, टाळेबंदीमुळे बांधकामाला उशीर झाला आहे. कंत्राटदाराला ते लवकरात पूर्ण करण्याचे निर्देश उपसभापती फर्नांडिस यांनी दिले.
पाळोळे किनाऱ्यावर सुलभ शौचालय आहे. परंतु पर्यटकांसाठी अद्यावत प्रसाधनगृह व कपडे बदलण्यासाठी कक्ष नाही. प्रत्येक किनाऱ्यावर ही सोय उपलब्ध करून देण्याची पर्यटन खात्याची तयारी आहे. पण, जमिनीअभावी आगोंद, पाटणे व अन्य किनाऱ्यावर प्रसाधनगृहाची उभारणी करणे शक्य होत नसल्याचे उपसभापतीनी सांगितले. यावेळी उपसभापती फर्नांडिस यांनी पाळोळे व अन्य प्रभागातील मॉन्सूनपूर्व गटारे उपसणे व अन्य कामांची पहाणी केली.

 

 

संबंधित बातम्या