डिचोलीतील धोकादायक झाडे तोडण्याचे निर्देश

dainik gomantak
सोमवार, 1 जून 2020

झाडे तोडण्यासाठी जवळपास ३ लाख रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे. असे त्यांनी म्हटले आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार अत्यंत धोकादायक झाडे तोडण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिचोली,

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत धोकादायक झाडे कापावीत. असे निर्देश डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पंचायती आणि अन्य यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार सध्या रस्त्याच्या बाजूने धोकादायक अवस्थेतील झाडे कापण्यात येणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, मये पंचायत क्षेत्रात आजपासून (रविवारी) धोकादायक झाडे कापण्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी पावाळ्यात झाडांची पडझड होत असते. वादळी पावसावेळी तर झाडे कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. मागीलवर्षी पावसाळ्यात डिचोली तालुक्‍यातील विविध भागात घरे तसे वीजवाहिन्यांवर मिळून दोनशेहून अधिक झाडे कोसळली होती. या पडझडीत वीज खाते आणि नागरिकांची मिळून लाखो रुपयांची वित्तहानी झाली होती. अशी माहिती उपलब्ध झाली आहेत. यंदाही गेल्या महिन्यापासून दोनवेळा पडलेल्या वादळी अवकाळी पावसात आतापर्यंत तालुक्‍यातील विविध भागात मिळून पंचवीसच्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. त्यात काही घरांची मोडतोड झाली आहे. झाडांची पडझड झाली की, दरवर्षी मोठी वित्तहानी आदी आपत्ती ओढवत असते. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत केलेल्या पाहणीअंती डिचोलीत बऱ्याचठिकाणी काही झाडे अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. ही धोकादायक झाडे तोडा. असे निर्देश संबंधितांना आपत्कालीन यंत्रणेने दिल्याची माहिती मिळाली आहे.

मयेत ६० झाडे धोकादायक
यंदा केलेल्या पाहणीअंती मये पंचायत क्षेत्रात जवळपास ६० झाडे धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. ही धोकादायक झाडे तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास चोडणकर यानी दिली. वीज खात्याचे कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात पंचायत क्षेत्रातील धोकादायक झाडे तोडण्यास आजपासून (रविवारी) प्रारंभ करण्यात आला आहे. असे श्री. चोडणकर यांनी सांगून, ही झाडे तोडण्यासाठी जवळपास ३ लाख रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे. असे त्यांनी म्हटले आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार अत्यंत धोकादायक झाडे तोडण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

GOA GOA GOA 

संबंधित बातम्या