इफ्फीच्या उद्घाटन समारंभात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक

ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे...
इफ्फीच्या उद्घाटन समारंभात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक
IFFI 2021 : Insulting journalists at IFFI inaugurationDainik Gomantak

पणजी IFFI 2021 : अत्यंत बेजबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र आणि राज्यातील सर्वात भ्रष्ट भाजप सरकाराला प्रत्येक कार्यक्रमातून आपले नशीब कमवायचे आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मोदी-शाह जोडीच्या क्रोनी कंपनीला प्रसारण हक्क विकण्याच्या आणि गोव्यातील फोटो पत्रकारांना आज इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी प्रवेश नाकारण्याच्या कृतीचा काँग्रेस पक्ष निषेध करतो.

IFFI 2021  : Insulting journalists at IFFI inauguration
गोवा फॉरवर्ड का सोडला याबद्दल सरदेसाई यांच्याकडून खुलासा..!
आंदोलना दरम्यान स्थानिक फोटो पत्रकार
आंदोलना दरम्यान स्थानिक फोटो पत्रकार Dainik Gomantak

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मोदी-शाह यांच्या क्रोनी कंपनीला प्रसारण हक्क विकण्याच्या तसेच गोव्यातील फोटो पत्रकारांना आज इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी प्रवेश नाकारण्याच्या कृतीचा काँग्रेस पक्ष निषेध करतो अशी प्रतिक्रिया समोर येत असून,

भाजप सरकारच्या भांडवलशाही समर्थक निर्णयाविरोधात स्थानिक फोटो पत्रकारांना आंदोलन करावे लागले ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. आम्ही गोवा फोटो जर्नलिस्ट असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आणि गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट यांच्याशी पूर्ण एकजुटीने उभे आहोत आणि गोव्यातील कष्टकरी पत्रकार बांधवांना आमचा पाठिंबा देत राहू.

अमरनाथ पणजीकर..

अध्यक्ष - मीडिया सेल (GPCC)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com