Mormugao : आंतरराष्ट्रीय प्रवासी पर्यटक जहाज एमव्ही "बोरेलिस" मुरगाव बंदरात दाखल

1348 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन एमव्ही "बोरेलिस" जहाज दाखल
Mv Borealis Ship
Mv Borealis ShipDainik Gomantak

"बोरेलिस" हे जहाज देशी विदेशी पर्यटकांना घेऊन आज बुधवारी मुरगाव बंदरात दाखल झाले. सकाळी 6:45 वाजता बंदराच्या हद्दीत दाखल झाले. जहाजावरील पर्यटकांनी गोव्यात भ्रमंती केल्यानंतर संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोचिनला जाण्यास जहाज रवाना झाले.

2022-23 या पर्यटन हंगामातील विदेशी पर्यटक जहाज एमव्ही " बोरेलिस "आज मुरगाव बंदरात सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी 718 प्रवासी व 630 कर्मचारी मिळून 1348 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले.

Mv Borealis Ship
Quepem : पारोडा खून प्रकरणातील आरोपी अवघ्या 48 तासात गजाआड

सदर जहाज मुंबई मार्गे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले होते. हे पर्यटक जहाज जे एम बक्सी यांच्या प्रायोजनाखाली मुरगाव बंदरात दाखल झाले. यानंतर पर्यटक सर्व सोपस्कर पुर्ण करून गोवा भ्रमंतीसाठी रवाना झाले.

गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आस्वाद घेतल्यानंतर पर्यटक पुन्हा मुरगाव बंदरात दाखल होऊन जहाजात रवाना झाले. नंतर सदर जहाज संध्याकाळी 4 वाजता कोचिनला जायला रवाना झाले.यावेळी कोणत्याही प्रवाशांनी सामील होण्यासाठी किंवा गोव्यात उतरण्याची योजना आखली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com