Sadetod Nayak : भाजपसमोर ‘लोटांगण’ घालणाऱ्या संघाची अवनती

मातृभाषा बचाव आंदोलनानंतरच्या राजकीय स्थितीवर वेलिंगकरांकडून प्रकाश
SADETOD NAYAK | Subhash Velingkar
SADETOD NAYAK | Subhash VelingkarDainik Gomantak

Sadetod Nayak : भारतीय भाषा सुरक्षा मंचाने जेव्हा मातृभाषा बचावसाठी आंदोलन सुरू केले, तेव्हा ज्या अंतर्गत घडामोडी घडल्या त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यात एक बाब केंद्रीय स्तरावर पोहोचली, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रीय भाजप नेत्यांच्या दडपणामुळे तत्त्वापासून यूटर्न घेतला.

कालपर्यंत संघ मातृभाषा बचाव आंदोलनात होता, तो दुसऱ्या दिवशी आंदोलनात दिसलाच नाही. त्यामुळे हा जो प्रकार घडला होता, त्याचा अपप्रचार सर्वत्र झाला होता. या घटनेतील सत्य काय ते बाहेर येण्यासाठी हे ‘लोटांगण’, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

गोमन्तक टीव्हीच्या सडेतोड नायक कार्यक्रमात ‘लोटांगण’ पुस्तकाचे लेखक वेलिंगकर यांची गुरुवारी (ता.30) मुलाखत घेतली. त्या अनुषंगाने पुस्तकात काय आहे, या विषयावर झालेल्या संवादाचा थोडक्यात सारांश.

SADETOD NAYAK | Subhash Velingkar
Aam Aadmi Campaign :आम आदमी पक्ष राज्‍यात राबवणार ‘मोदी हटाव-देश बचाव’ अभियान

वेलिंगकर यांच्या मते, भारतीय भाषा सुरक्षा मंचात राहून काम करण्याची वेळ ज्यांच्यावर आली, त्यांना संघात राहून चालणार नाही. 50-60 वर्षे संघाचे काम करणाऱ्यास भाजपचा जयजयकार करायला हवा, इंग्लिश मीडियम शाळांना दिलेल्या निधीचे समर्थन करायला हवे. असे तत्त्व सोडून काम करण्याचे 95 टक्के लोकांनी टाळले, त्याच्याबद्दल हे ‘लोटांगण’ आहे.

आपणास राष्ट्रीय स्तरावर लक्ष्य केले आहे, हे मान्य आहे. विभागाच्या संघचालकास प्रांत संघचालकाने काढले तरी चालते. येथे मात्र अखिल भारतीय संघाच्या मनमोहन वैद्य यांनी तीन पत्रे लिहिली. त्यामुळे गोव्यातील संघात पडलेली ही एक मोठी फूट मानावी लागेल.

मनोहर पर्रीकर यांनी जे निर्णय घेतले ते एकहाती घेतले. त्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकरांनाही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ दिले नाहीत. त्यामुळे प्रशासनावर पकड पर्रीकरांची राहिली. मातृभाषेच्या प्रश्‍नावर निर्णय घेण्यासाठी जी समिती नेमली, त्यात त्यांनीच सदस्य नेमले.

समितीचे वेगळे मत, त्यांना नको होते म्हणून त्यांनी ते डावलले, असेही वेलिंगकर सांगतात. आम्ही विरोधाची भूमिका निवडली. आपल्याबरोबर जे लोक आहेत, त्यांनी संघाचे काम उभारले आहे.

मातृभाषा प्रश्‍नावर संघर्ष सुरू झाल्यानंतर पर्रीकरांना बैठक घेऊया म्हणून सांगितले होते. राजकीय महत्त्वाकांक्षा काही नव्हती, वाद होता तो मातृभाषा प्रश्‍नावर होता, असे त्यांनी नमूद केले.

SADETOD NAYAK | Subhash Velingkar
Saras festival : सरस प्रदर्शनावर वजन-माप खात्याने टाकला छापा

दीनदयाळ उपाध्याय विचार देणारे, त्यांनी राजकीय तत्त्वज्ञान लिहिले. त्यांच्या मते राजकीय पक्ष तत्त्वाचे आचरण करणाराच हवा. तत्त्वांना तिलांजली दिल्यास तो पक्ष बुडवू. इतर राजकीय पक्षांशी संघाची बांधिलकी नाही, ती भाजपकडे अधिक आहे.

मूळ भाजप राज्यात संपला आहे. ‘केडर’ म्हणून जे बोलतात, कोणी किती संघाला बुडविले ते आपणास पूर्ण माहिती आहे. तत्त्वाच्या दृष्टीने देशपातळीवर संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. ‘कॅसिनो’प्रश्‍नी नो कमेंट्स म्हणतात, त्यामुळे संघाची भूमिका ही ‘नो कमेंट्स’ अशीच झाली आहे, असे वेलिंगकर म्हणाले.

राजकीय प्रवेशावर वेलिंगकर म्हणतात, गोवा सुरक्षा मंच जेव्हा काढला, तेव्हा भारत माती की जय म्हणून काढला नाही. मगोप सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा द्यायचे ठरले होते. परंतु सुदिन ढवळीकर सत्तेतून लवकर बाहेर पडले नाहीत.

इंग्रजीकडे असणारा ओढा त्यामुळे पुढे प्रादेशिक भाषेतील शाळा कशा चालतील, या प्रश्‍नावर वेलिंगकर म्हणतात, लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मराठी व कोकणीतील प्रत्येक विद्यार्थ्यास 400 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु ही योजना प्रमोद सावंत यांनी काढूनच टाकली. संघाच्या शाळांमध्ये प्रवेश फुल्ल होतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास लोक येतात.

ठरवतात एक आणि करतात दुसरेच!

"गोव्यातील उदाहरणावरून संघ ठरवतात एक आणि करतात दुसरे, अशी अविश्‍वसनीयता निर्माण झाली. राजकीय सत्ता नसती तर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीवर एक विचित्र परिस्थिती आली असती. ‘लोटांगण’ या पुस्तकात जो खोटारडेपणा सांगितला जातो, त्यावर प्रकाश टाकला आहे."

- प्रा. सुभाष वेलिंगकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com