Goa Land Grabbing: जमीन घोटाळा प्रकरणाचा निवृत्त न्यायमूर्तींकडून तपास सुरु

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी आज गुरुवारी आसगाव पंचायतीला भेट दिली.
Goa Land Grabbing
Goa Land GrabbingDainik Gomantak

बार्देश तालुक्यातील आसगाव पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर व परस्पररित्या जमीनींचे खरेदी-व्रिकी व्यवहार झाल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणांचा एसआयटीमार्फत तपास सुरू आहे.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील बेकायदेशीरपणे जमीन बळकावण्याच्या घटनांच्या चौकशीसाठी एकमेव सदस्य आयोग म्हणून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी आज गुरुवारी आसगाव पंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत अधिकारी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव सशस्त्र पोलीस टीम तैनात होती. काही दिवसांपूर्वी राज्यातील जमिन हडप प्रकरणी एसआयटीने आसगाव येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपनिबंधक प्रेमानंद देसाई याला अटक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com