Sara Khan Case in Goa : ड्रग्ज सेवन केल्याचं तपासात उघड; सारा खान प्रकरणात मोठी अपडेट

मादक पदार्थांचे सेवन केल्यावर अत्यवस्थ झालेल्या खान यांना दोनापावला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sara Khan Case in Goa
Sara Khan Case in GoaDainik Gomantak

अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याप्रकरणी सारा खान आणि त्यांचा सहकारी मित्र डॉ. अभिषेक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचे गोव्यात वास्तव्य असलेल्या सिकेरी येथील पंचतारांकित हॉटेलच्या रुमची कळंगुट पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी फॉरेन्सिक विभागाच्या पथकासमवेत तपासणी केली. यावेळी पीआय सावंत यांनी या प्रकरणी मोठी अपडेट दिलीय.

दिल्लीस्थित आर्थिक सल्लागार सारा खानच्या मूत्र चाचणीत तिने कोकेन आणि अ‍ॅम्फेटामाइन सेवन केल्याचे उघड झाले आहे. एका ड्रग्स विक्रेताने पार्टीच्या ठिकाणाजवळ खान आणि सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना अमली पदार्थ देऊ केले. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. दुसरीकडे कळंगुट पोलिसांकडून याप्रकरणात दिल्लीस्थित सारा खान तसेच उत्तर प्रदेश (वाराणसी) येथील डॉ. अभिषेक सिंग तसेच अज्ञात ड्रग्स पेडलर यांच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sara Khan Case in Goa
Caves in Goa : साकोर्ड्यातील शैवपंथीय गुंफा

मंगळवारी रात्री हणजूण-वागातोर येथील एका नाईट क्लबमध्ये डिनर पार्टीवेळी सारा खान यांनी मादक पदार्थांचे अतिसेवन केल्यावर अत्यवस्थ झालेल्या खान यांना दोनापावला येथील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या सारा यांच्यावर दोनापावला येथील एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com