'गोवा मुक्तिदिन सोहळ्याचं स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण नाही'

गोम्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 डिसेंबर 2020

मुक्तीदिन कार्यक्रमासाठी सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रणे दिली नसल्याचे समोर आले असून याबद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

फातोर्डा :  मुक्तीदिन कार्यक्रमासाठी सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रणे दिली नसल्याचे समोर आले असून याबद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्तीदिन कार्यक्रमासाठी सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रणे दिली नसल्याचे ऐकून मला धक्काच बसला व अत्यंत वाईट वाटले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागानेच आजचा दिवस बघणे आम्हाला  शक्य होत आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे कामत यांनी सांगितले. स्वातंत्र्यसैनिकांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुक्तीदिन कार्यक्रमात राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण न देण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, गजनान रायकर, गोपाळ चितारी व शशिकला होडारकर यांनी व्यक्त केली आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत उद्या साजरा होणाऱ्या गोवा मुक्ती दिनाच्या सोहळ्यास आमंत्रण नसल्याने स्वातंत्र्यसैनिक नाराज झाले आहेत. राष्ट्रपती कोणाला भेटायला येतात हा प्रश्र्न उपस्थित होतो, असे स्वातंत्र्यसैनिक गजानन रायकर यांनी सांगितले.गोवा मुक्तीसंग्राम सोहळ्यावर एवढा पैसा खर्च करण्याची मुळीच गरज नाही. आम्हाला आमंत्रण पण देण्यात आलेले नाही. हा पैसा स्मारके दुरुस्त करण्यासाठी वापरावा व आम्हाला मिळणारे पेन्शन वेळेवर मिळावे, असे शशिकला होडारकर आल्मेदा यांनी सांगितले.
सरकारने आम्हाला सोहळ्यास नेण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. निधी अभावी सरकारच्या योजना व्यवस्थित कार्यरत नाहीत. सर्वच स्वातंत्र्यसैनिक म्हातारे झाले आहेत. लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण पाहण्याची आपल्याला इच्छा असल्याचे वामन प्रभुगावकर यांनी सांगितले. गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठीचा निधी योग्यप्रकारे व योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. सर्व योजना चालू ठेवल्या पाहिजेत. शिवाय स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलांना नोकरीची गरज आहे. 

 

अधिक वाचा :

गोवा मुक्ती संग्रामाला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या घटना

गोवा मुक्तिसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींनीची मुख्यमंत्री झाली आठवण

..आणि उगवला ‘सोनियाचा दिन’ ; थरारानंतर गोवा मुक्तिदिनाची पहाट

 

संबंधित बातम्या