IPL Cricket Betting करणारी टोळी कळंगुट येथून जेरबंद

दोन लाखांच्‍या मुद्देमालासह राजस्थानचे चौघे अटकेत
IPL Cricket Betting करणारी टोळी कळंगुट येथून जेरबंद
IPL Cricket Betting caseDainik Gomantak

पणजी: कळंगुट (Calangute) येथील डिसोझा गेस्ट हाऊसवर गोवा पोलिसांच्या (Goa Police) क्राईम ब्रँचने (Crime Branch) काल (28सप्टेंबर) रात्री उशिरा छापा टाकून सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी (IPL cricket betting) चौघांना अटक केली. त्यांनी कालच्‍या सामन्यांसाठी सुमारे चार लाखांची रक्कम सट्टेबाजीसाठी घेतली होती. या छाप्यावेळी रोख रकमेसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

IPL Cricket Betting case
एफसी गोवाची अंतिम फेरीत धडक

अटक केलेल्यांची नावे प्रताप रुप सिंग (29), राजवीर शंभू सिंग (30), मोहन रोहिताशाव लाल (33) व अजय विजयसिंग यादव (33) अशी असून हे सर्व राजस्थानमधील आहेत. या छाप्यावेळी पोलिसांनी रोख 6500 रुपये, कॉल कनेक्टर यंत्र, टेलिव्हिजन सेट, राऊटर, लॅपटॉप, मोबाईल्स जप्त केले आहेत. कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्‍यावर पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखालील क्राईम ब्रँचच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.