गोव्याच्या आयपीएससीडीएल संचालक मंडळाची बैठक ; स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांवर चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) संचालक मंडळाची आज दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आयपीएससीडीएलने यापूर्वी पूर्ण केलेल्या व सुरू केलेल्या कामांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

पणजी :   इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) संचालक मंडळाची आज दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आयपीएससीडीएलने यापूर्वी पूर्ण केलेल्या व सुरू केलेल्या कामांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना तत्काळ दिल्लीला निघावे लागल्याने काही विषय पुढील बैठकीत चर्चेला घेतले जाणार आहेत. 

आयपीएससीडीएलच्या नव्याने पुनर्रचना संचालक मंडळाच्या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता होती.  नव्याने नियुक्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत कुमार (आयएएस) तसेच नव्याने संचालक म्हणून आलेले आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर उदय मडकईकर, यांच्यासह महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स, इतर अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थिती लावली.  जुन्या सचिवालयाच्या इमारतीतील आयपीएससीडीएल कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदिप्तापाल चौधरी यांची हकालपट्टी झाल्यानंतर या बैठकीत त्यांच्या काळात सुरू झालेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांवर चर्चा झाली. 
आयपीएससीडीएलने तूर्त शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांचा विषय बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जी कामे सुरू आहेत ती वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना तत्काळ दिल्लीला जावयाचे असल्याने त्यांनी काही निर्णय पुढील बैठकीत चर्चेला येणार असल्याचे यावेळी सांगितले आणि ते विमानतळाकडे निघण्यास तेथून निघाले.

अधिक वाचा : 

गोव्याच्या जलक्रीडा धोरणात बदल.. 

गोव्याच्या खाणपट्ट्यातील अंदाधुंदी सुरूच..! 

गोव्यातील अनुसूचित जाती जमातीच्या नऊ खटल्यांचा एका महिन्यात निवाडा

संबंधित बातम्या