Goa News: रस्ता दुभाजकातील वीज खांबावरील जाहीरात फलकांची लोखंडी फ्रेम धोकादायक!

जाहीरात फलकांच्या लोखंडी चौकड्यांमुळे (फ्रेम) दुचाकी वाहनचालकांना अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
Goa Latest News
Goa Latest NewsDainik Gomantak

वास्को: वास्को येथील एफ. एल गोम्स मार्गावरील रस्ता दुभाजकातील वीज खांबावर लावण्यात आलेल्या जाहीरात फलकांच्या लोखंडी चौकड्यांमुळे (फ्रेम) दुचाकी वाहनचालकांना अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर चौकड्या तेथून हलविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केली आहे.

(iron frame of billboards on electricity pole in road divider dangerous)

Goa Latest News
Crocodile In Farm|अखेर मगर सापळ्‍यात अडकली!

एफ. एल. गोम्स मार्गावरील तात्पुरते मासळी मार्केट ते वास्को पोलिस स्थानक दरम्यानच्या रस्ता दुभाजकातील वीज खांबावर जाहीरात फलक लावण्यात आले होते. आता त्या जागी फक्त जाहीरात फलाकांच्या लोखंडी चौकट्या नजरसे पडत आहे.

सदर चौकड्या खांबावर अतिशयखाली बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवाहन या चौकड्यांना आपटून अपघाताला सामोरे जाण्याची भीती पोळजी यांनी व्यक्त केली आहे. सदर चौकड्या तेथून हलविण्यासाठी संबधितांनी त्वरित पाऊले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. वीज खांबांवर अतिशय खाली या चौकट्या बांधण्यात आल्याबद्दल पोळजी यांनी आश्चर्य व्यक्त केले. वीज खात्याने जाहीरात फलकांसाठी परवानगी देताना तेथे नियमाचे पालन होते की नाही यासंबंधी दक्षता घेण्याची गरज आहे. मुरगाव पालिकेनेही याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com