रुमडामळ-दवर्लीच्या सरपंचदी इशा नाईक यांची बिनविरोध निवड

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

माजी सरपंच समुल्ला फणिबंध यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पंचायतीचे सरपंच रिक्त झाले होते. आज (बुधवारी) इशा नाईक यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

नावेली- रुमडामळ-दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच समुल्ला फणिबंध यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पंचायतीचे सरपंच रिक्त झाले होते. आज (बुधवारी) इशा नाईक यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

यावेळी उपसरपंच मधुकला शिरोडकर, माजी सरपंच समुल्ला फणिबंध, पंच सदस्य विनायक वळवईकर, अविता चोडणकर, विश्वदास नाईक, सोफिया शेख उपस्थित होते. 
निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी आंजेलीयो ग्रासीयस उपस्थित होते. पंचायत सचिव प्रसीला नोरोन्हा उपस्थित होते. दवर्ली जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर यांनी नवनिर्वाचित सरपंच नाईक यांचे अभिनंदन
केले.

संबंधित बातम्या