संगीतरजनी, पार्ट्यांकडे गोवा प्रशासनाचे दुर्लक्ष

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

मागच्या तीन दिवसांपासून मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल किनारी जमावबंदीच्या आदेशाची होळी करत किनाऱ्यावर आणि पार्टी क्लबमध्ये शेकडो पर्यटकांना घेऊन जंगी पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. त्या पार्ट्यावर प्रशासनाने कोणतीच कारवाई किंवा गुन्हा नोंद केला नाही

मोरजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. चारपेक्षा अधिक  नागरीक सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येऊ शकत नाही. मात्र, मागच्या तीन दिवसांपासून मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल किनारी जमावबंदीच्या आदेशाची होळी करत किनाऱ्यावर आणि पार्टी क्लबमध्ये शेकडो पर्यटकांना घेऊन जंगी पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. त्या पार्ट्यावर प्रशासनाने कोणतीच कारवाई किंवा गुन्हा नोंद केला नाही. केवळ संगीत बंद करण्याचे नाटक पोलिसांनी पहाटे केले त्‍याबद्दल स्‍थानिकांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि रंगोत्‍सव, शिगमोत्सवात मोरजी आश्वे मांद्रे या ठिकाणी सलगपणे तीन दिवस जंगी पार्ट्यांचे आयोजन केले होते. या पार्ट्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती. एका बाजूने जमावबंदीचा आदेश तर दुसऱ्या बाजूने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली का, असा प्रश्‍‍न स्‍थानिकांकडून केला जात आहे.

होळयेच्या देवराईची खरी शान होती महाकाय वृक्ष! 

कोरोना संसर्ग सध्या वाढत आहे. गेल्या पर्यटन हंगामातच कोरोनाने राज्यात डोके वर काढले होते. त्यावेळी पर्यटन हंगामाबरोबरच इतर सर्व व्यवसाय धोक्यात आले होते, सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. यंदातरी पर्यटन हंगाम पूर्वपदावर येणार अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परत एकदा सर्व व्यावसायिकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

26 मार्च ते 29 असे सलग चार दिवस किनारी भागात जंगी पार्ट्यांचे आयोजन तेही जमावबंदीचा आदेश असताना केले. या पार्ट्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात होता. स्थानिकांनी वारंवार पोलिसांना फोनवरून कळवले, मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. जमावबंदी असतानाही शेकडो पर्यटक पार्ट्यात सहभागी झाले होते. मात्र, प्रशासनाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. 30रोजी पहाटे पोलिसांनी पार्ट्या बंद केल्या, मात्र कारवाई झालीच नाही व गुन्हा नोंद नाही, त्‍याबद्दल स्‍थानिकांकडून आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

गोव्यात 45 वर्षांवरील ‘कोविड’ प्रतिबंधक लसीकरण सुरू

संबंधित बातम्या