मृत्यू दर कमी करण्यासाठी विलगीकरण उत्तम पर्याय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी घरगुती विलगीकरणात असणाऱ्यांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. घरगुती विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आयसोलेशन किटसाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल, तर त्यांनाही ते किट मिळू शकणार आहे.

पणजी:  राज्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी घरगुती विलगीकरणात ठेवण्यात आलेले हे ‘गेम चेंजर'' ठरू शकतात. त्याचबरोबर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आवश्‍यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा वाढविणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍जित राणे यांनी आजच्या कोरोनाविषयी झालेल्या बैठकीत दिली. 

कोरोनाविषयी आज आरोग्य समितीची बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री राणे म्हणाले, की राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी घरगुती विलगीकरणात असणाऱ्यांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. घरगुती विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आयसोलेशन किटसाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल, तर त्यांनाही ते किट मिळू शकणार आहे. प्रत्येक कुटुंबात एक किट दिले जाईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तिला कोरोनाची लागण झाली असेल, तर त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी गोळ्या दिल्या जातील.

गोवा इलेक्ट्रॉनिकच्या मदतीने किट वाटपावर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. गोमेकॉमध्ये ॲफेरेसिस मशिन लवकरच बसविली जाणार आहे. घरगुती विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची मानसिक तंदुरुस्ती पाहण्यासाठी सल्ला दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या