आता गोव्यात फिल्म शुटिंगसाठी घ्यावी लागणार परवानगी

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

गोव्यात अनधिकृत चित्रपट चित्रिकरण चालू असल्याचे प्रकार आढळून आले आहेत. कोणत्याही चित्रिकरणासाठी गोवा मनोरंजन संस्थेकडून (ईएसजी) ‘ना हरकत दाखला’ घेणे अनिवार्य आहे.

पणजी: गोव्यात अनधिकृत चित्रपट चित्रिकरण चालू असल्याचे प्रकार आढळून आले आहेत. कोणत्याही चित्रिकरणासाठी गोवा मनोरंजन संस्थेकडून (ईएसजी) ‘ना हरकत दाखला’ घेणे अनिवार्य आहे. परवान्‍याविषयी माहिती असूनदेखील हे प्रकार आढळून येत असल्‍याच्‍या तक्रारी आल्या आहेत. 

मनोरंजन संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या लाईन प्रोड्यूसर्सला आणि गोमंतकीय निर्माते व प्रॉडक्शन हाऊसला असा दाखला देण्यासाठी ईएसजी ही मुख्य संस्था आहे. गोवा मनोरंजन संस्थेकडे ई-मेल वा विहित नमुन्यातील पत्राद्वारे चित्रीकरणाच्या ‘ना हरकत दाखल्‍या’साठी अर्ज करावा लागतो. अर्जाची छाननी केल्यावर ईएसजी प्रक्रिया शुल्कापोटी दहा हजार व संबंधित ग्रामपंचायतीला द्यावयाच्या शुल्कापोटी तीन हजार रुपये आकारते. शुल्काचा भरणा केल्यानंतर ‘ना हरकत दाखला’ देते. अधिक माहितीसाठी ईएसजीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
गोव्यातील आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेला नकार 

संबंधित बातम्या