ढवळीकरांच्या तोंडी अन्यायाची  भाषा न शोभणारी : ताम्हणकर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

माजी वाहतूक मंत्री आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी मांद्रे येथे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले.

 

पणजी : माजी वाहतूक मंत्री आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी मांद्रे येथे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. त्यावर आज अखिल गोवा बस वाहतूक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी आक्षेप नोंदविला.

काँग्रेस आणि भाजपमध्ये मंत्रिपद भोगणाऱ्या ढवळीकरांनी बस धारकांना विविध मार्गाने त्रास दिला. ज्या सरकारात राहून मंत्रिपद भोगतात त्यांच्यावर टीका करणे अन्याय झाल्याचे सांगणे हे त्यांना न शोभणारे आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो असे ताम्हणकर म्हणाले .

संबंधित बातम्या