जोरदार पावसाने झोडपले

Tejshri Kumbhar
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सोमवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. समुद्रालाही उधाण आले. अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेले. वाहनांवरही झाडे पडली. वेर्णा येथे एका कारवर झाड पडल्‍याने सुनील नाईक हे ठार झाले. अग्‍निशामक दलाने कारवरील झाड कापून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत पणजीत तब्‍बल ४ इंच पावसाची नोंद झाली. ५ ऑगस्ट रोजीही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

तेजश्री कुंभार

पणजी :

सर्वत्र पडझड, वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यासह आलेल्‍या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. वीजतारांवरही झाडे, फांद्या पडल्‍याने वीजप्रवाह खंडित झाला. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस अडथळा आला होता. पणजीत आल्तिनो येथे दोन ठिकाणी झाडे कोसळली. सिकेरी येथे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. राजधानी पणजीत रस्त्यावर पाणी साचले होते. मात्र, रस्त्यावर वाहनांचे प्रमाण कमी असल्याने वाहतूक कोंडी अधिक झाली नाही. आज दिवसभरात वाऱ्याचा वेग अधिक होता. राज्यातील तापमान पावसामुळे चांगलेच कमी झाले असून हवेत गारवा आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कमीत कमी २३ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळाली.

आजही पाऊस
पुढील दोन दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ५ रोजी ४५ ते ५५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त करून ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. हरमल, मांद्रे, कळंगुट, काणकोण समुद्रकिनाऱ्याला उधाण आल्‍याने मोठमोठ्या लाटा उसळत होत्या.

पेडण्‍यात सर्वाधिक पाऊस
राज्यात मंगळवारी पेडणे, सांगे, केपे, फोंडा, साखळी, वाळपई, दाबोळी, एला (जुने गोवे), काणकोण, मुरगाव व पणजी भागात पावसाची जोरदार वृष्टी झाली. पेडण्यात सर्वाधिक १७ सें.मी. एवढा पाऊस झाला. सांगेत १६ सें.मी., केपेत १४, साखळी व फोंड्यात प्रत्येकी १३, वाळपईत १२, दाबोळीत ११, एला (जुने गोवे) भागात १०, काणकोण व मुरगाव येथे प्रत्येकी ८, पणजीत ७ सें.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या