शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची चिन्हे अंधूक

It seems difficult to start new academic year
It seems difficult to start new academic year

पणजी:  राज्यातील शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे वेळेवर सुरू होऊ शकले नाही. कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्यास शाळा सुरू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू असला तरी मुख्याध्यापक संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार पालक मुलांना शाळेत पाठवण्यास राजी नाहीत असे आढळून आले आहे. त्यामुळे गोव्यातील शैक्षणिक वर्ष दिवाळीनंतरही सुरू होण्याची चिन्हे अंधूक आहेत. 

राज्यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे असल्याने ते वाया जाऊ नये म्हणून सरकार प्रयत्नरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहावी व बारावीचे वर्ग सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील घटकांशी चर्चा करून निर्णय घेणार होते. मात्र मुख्याध्यापक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात सरकारी अनुदानित २०९ पैकी १९६ शाळा संस्थांनी  शाळा सुरू करण्यास हरकत घेतली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला तरी शाळा न उघडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. सध्या कोरोना महामारीचे प्रमाण कमी झालेले नाही व धोकाही अजून टळलेला नाही. अजूनही कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे अशा स्थितीत शैक्षणिक संस्था शाळा सुरू करण्यास राजी नाहीत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मारियानो वालादारिस यांनी दिली.

 शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोणी जबाबदारी घ्यायची हा प्रश्‍न सरकार तसेच शाळा व्यवस्थापनासमोर पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रश्‍नाला सरकार व शाळा व्यवस्थापनही उत्तर देऊ शकलेले नाही. 
सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते सर्वच विद्यार्थ्यांना मिळते असे नाही. किमान १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मात्र विविध घटकांना विश्‍वासात घेतल्याशिवाय सरकार कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com