गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा अद्याप गुलदस्त्यातच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पक्षाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडुराव यांचा अहवाल दिल्लीत पोहोचल्यानंतरच काय तो निर्णय होणार आहे.

पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पक्षाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडुराव यांचा अहवाल दिल्लीत पोहोचल्यानंतरच काय तो निर्णय होणार आहे. तूर्त चोडणकर हेच पदावर कायम राहणार आहेत. गुंडुराव यांनी काल पणजीतील काँग्रेस कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांनीच चोडणकर हे जिल्हा पंचायत निवडणुकीतील पराभवाला जबाबदार नाहीत, असे सांगितले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे मतदारसंघाची जबाबदारी कशी दिली होती आणि ते प्रचारासाठी कसे फिरकलेच नाहीत, याचा पाढाच काही जणांनी वाचला. चोडणकर यांनी पक्ष संघटनेसाठी दिलेले योगदान, पुढे आणलेले युवा नेतृत्व. सरकारच्या निर्णयांविरोधात आणि जनतेचे प्रश्न घेऊन उभारलेली आंदोलने हे सारे या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. 

संबंधित बातम्या