हिंदू समाज करणार ‘सुडा’ ला सहाय्य

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

सध्या ही स्मशानभूमी बांधण्यासाठी ‘सुडा’ने पुढाकार घेतला आहे. पालिका आणि समाजाकडून नियोजित स्मशानभूमी विषयीची कागदपत्रे ‘सुडा’ने मागविली आहे. मायमोळेत स्मशानभूमी होणे काळाची गरज असल्याने मुरगाव हिंदू समाजाने ‘सुडा’ला सर्वोत्तपरी सहाय्य करण्याचे ठरविले आहे.

 

मुरगाव: मायमोळे वास्को येथील नियोजित स्मशानभूमी राज्य सरकारच्या ‘सुडा’तर्फे बांधण्याची योजना मुरगाव पालिकेने आखली आहे. त्या कामात मुरगाव हिंदू समाजाला सहभागी करून घ्यावे, अशी विनंती समाजाची असल्याची माहिती उपाध्यक्ष शेखर खडपकर यांनी दिली.

वास्को मायमोळे येथील पडिक शेत जमिनीत मुरगाव हिंदू समाजाकडून स्मशानभूमी बांधण्याची योजना होती. त्यासाठी समाजाने मुरगाव पालिकेकडून मायमोळे येथील ६८०० चौ. मी. पडिक शेत जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी पालिका मंडळाने ठरावही मंजूर केला होता. गीफ्ट डीड करून ही जमीन समाजाच्या ताब्यात देणार होती. पण, तांत्रिक कारणामुळे हा व्यवहार न झाल्याने स्मशानभूमी बांधण्याची योजना लांबणीवर पडली.

दरम्यान, विद्यमान स्मशानभूमी खारवीवाडा समुद्र किनाऱ्यावर खाजगी जमीनीत आहे.तीची देखभाल मुरगाव हिंदू समाज करीत आहेत. तथापि, मुरगाव बंदराच्या विस्तारीकरणामुळे ही स्मशानभूमी पाडण्याची शक्यता असल्याने मुरगाव हिंदू समाजाने मायमोळे येथील जागा निवडून तेथे अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पण, अद्याप जमिनीचा ताबा समाजाकडे आला नसल्याने नियोजित स्मशानभूमीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

भविष्याची गरज ओळखून हिंदू स्मशानभूमी लवकरात लवकर बांधून पूर्ण करणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन मुरगाव हिंदू समाजाने स्मशानभूमी बांधण्याचा केलेला संकल्प तडीस नेण्यासाठी अध्यक्ष नानासाहेब बांदेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली समाज प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. अत्याधुनिक स्मशानभूमी बांधण्यासाठी अनेकांनी अर्थ सहाय्य करण्याचेही वचन समाजाला दिलेले आहे. पण, पालिकेकडून जमिनीचा ताबा दिला जात नसल्याने समाजाचे स्वप्न तूर्तास भंग पावल्याचे खडपकर यांनी पत्रकारांना सांगितले.

सध्या ही स्मशानभूमी बांधण्यासाठी ‘सुडा’ने पुढाकार घेतला आहे. पालिका आणि समाजाकडून नियोजित स्मशानभूमी विषयीची कागदपत्रे ‘सुडा’ने मागविली आहे. मायमोळेत स्मशानभूमी होणे काळाची गरज असल्याने मुरगाव हिंदू समाजाने ‘सुडा’ला सर्वोत्तपरी सहाय्य करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्प बांधकामात समाजाला सहभागी करून घ्यावे, अशी विनंती ‘सुडा’कडे करण्यात येणार असल्याचे श्री. खडपकर म्हणाले. या पत्रकार परीषदेत समाजाचे सचिव संतोष खोर्जुवेकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या