देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षें गोवा मुक्तीसाठी लागली: मुख्यमंत्री सावंत 

श्यामा प्रसाद मुखर्जी यानी नवी दिल्लीत गोवा मुक्तीचा आवाज उठविला तेव्हांच, तेव्हांच्या भारत सरकारचे डोळे उघडले असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसीय राष्ट्रीय विचार मंथन परिषदेच्या उदघाटन सोहळ्यात सांगितले.
Chief Minister Pramod Sawant
Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

फातोर्डा : आमचा देश 1947 साली स्वतंत्र झाला मात्र गोव्याची पोर्तुगाली राजवटीतुन मुक्ती करण्यास 14 वर्षे लागली, या विषयी चिंतन मनन आवश्यक आहे. 436 वर्षांची पोर्तुगाली जुलमी व अत्याच्यारी राजवट तसेच देश स्वतंत्र झाल्यावर गोवा मुक्तीसाठी झालेल्या 14 वर्षांच्या विलंब काळातील परिस्थिती गोवा व गोवेकर कधीही विसरणार नाहीत. खरे म्हणजे 1955 साली इतर राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्यात प्रवेश करुन गोवा मुक्तीचा नारा सुरु केला. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी नवी दिल्लीत गोवा मुक्तीचा आवाज उठविला तेव्हांच, तेव्हांच्या भारत सरकारचे डोळे उघडले असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी दोन दिवसीय राष्ट्रीय विचार मंथन परिषदेच्या उदघाटन सोहळ्यात सांगितले. 

या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथीली डॉ. राममनोहर लोहिया रिसर्च फाउंडेशनने  रवीन्द्र भवन मडगाव तसेच कोकणी भाषा मंडळ यांच्या संयुिक्त विद्यमाने आयोजित केले आहे. या परिषदेचे उदघाटन गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता, रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ व रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक रंजन सिंग उपस्थित होते.

Chief Minister Pramod Sawant
माजी मंत्र्याचे बेकायदेशीर पाप माझ्या माथी मारु नका: मुख्यमंत्री सावंत

प्रसंगी डॉ. लोहिया संबंधीच्या पुस्तकांचे प्रकाशन तसेच देशातील व गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा मान्यवरांहस्ते सत्कार करण्यात आला. गोव्याच्या मुक्तीसाठी जरी विलंब झाला तरी स्वतंत्र झाल्यावर लगेच गोमंतकीयांनी आपण भारताचेच पुत्र आहेत हे सिद्ध करुन दाखविले. गोव्याच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

डॉ. राममनोहर लोहिया हे इंग्रजीतील स्कॉलर होते. तरी त्यांनी स्थानिक भाषेचा आग्रह धरला. त्यामुळे देशाच्या घटनेतही भारतातील स्थानिक भाषांना स्थान मिळू शकले असे राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यानी आपल्या भाषणात सांगितले. राजभवनातील ग्रंथालयात आपण महात्मा गांधी, डॉ. राममनोहर लोहिया व दिन दयाळ उपाध्याय यांच्या पुस्तकांचा संग्रह करण्याचे आदेश दिल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

जय हिंदचा मंत्र डॉ. लोहिया यानी प्रथम गोव्यात जागवला. गोव्यात अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याची शिकवण डॉ. लोहियानीच गोवेकराने दिली असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी सांगितले. नव्या पिढीला इतिहास कळावा म्हणुन अशा राष्ट्रीय विचार मंथन परिषदेची आवश्यकता आहे असे रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यानी सांगितले. या सभागृहात तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहे हे पाहुन अभिमान वाटतो असे ते म्हणाले.

डॉ. राममनोहर लोहिया रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक रंजन सिंग यांनी सर्वांचे स्वागत करताना या परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यानी सर्वांचे स्वागत केले.

Chief Minister Pramod Sawant
गोवा खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित

या प्रसंगी मान्यवरांहस्ते वामन प्रभुगावकर, एन्थनी फर्नांडिस, श्रीमती सुशीला पडियार, महेश बाबू, रामचंद्र केसरी या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच समाजवादी नेते दिनेश, संदीप मोरारका, स्वर्गीय जॉन फर्नांडिस, स्व. दिपक सेन गुप्ता, स्व. गजानन रायकर, श्रीमती शारदा सावईकर, स्व. ज्युलियो मिनेझीस, स्व, त्रिदीप चौधरी, स्व. बद्री विशाल कुट्टी, रेणुबाई मुसलगी यांचा लोहिया रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

दत्ता दामोदर नाईक यांच्या मूळ भाषणानंतर गोवा मुक्तीमध्ये महिलांची भुमिका, डॉ. लोहिया आणि भारतीय भाषा या विषयांवर चर्चासत्रे झाली. उद्या दिवसभरात डॉ. लोहिया आणि नागरी स्वातंत्र्य, गोवा मुक्तीमध्ये ख्रिस्ती धर्मियांचा सहभाग, डॊ लोहिया व्हिजन गोवा - काल, आज आणि उद्या या विषयांवर चर्चा सत्रे होणार असुन संध्याकाळी समारोप सोहळा होणार आहे. या दोन दिवसांच्या परिषदेस गोव्यासह इतर राज्यातील डॉ. लोहियाकडे संबंध आलेले अनेक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com