पेडणे बोगद्याच्या दुरुस्तीस आणखी पंधरा दिवस लागणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

ऑगस्‍टपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज कोकण रेल्वेतर्फे व्यक्त करण्यात आला होता. तथापि, भिंत कोसळल्याने झालेले नुकसान मोठे असून दुरुस्तीकामास आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. 

मडगाव: पावसामुळे कोसळलेली पेडणे बोगद्याची भिंत दुरुस्त करण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून रेल्‍वे वाहतूक सुरू करण्याचे कोकण रेल्वेचे प्रयत्न आहेत. 

संततधार पावसामुळे ६ ऑॅगस्ट रोजी पेडणे येथील बोगद्याची भिंत कोसळली होती. कोकण रेल्वेतर्फे लगेच ही भिंत दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले. तथापि, पावसामुळे माती कोसळत असल्याने दुरुस्तीकामात अडथळे येत आहेत. ऑगस्‍टपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज कोकण रेल्वेतर्फे व्यक्त करण्यात आला होता. तथापि, भिंत कोसळल्याने झालेले नुकसान मोठे असून दुरुस्तीकामास आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. 

बोगद्यच्या भिंतीचे दुरुस्तीकाम १० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे कोकण रेल्वेचे प्रयत्न आहेत, असे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले. या घटनेमुळे ११ सप्टेंबरपर्यंत कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या