Govind Gaude : ‘इथे ओशाळला मृत्यू’; घोड्यावर स्वार ‘संभाजीं’नी जिंकली प्रेक्षकांची मने

मांद्रेमध्ये मंत्री गोविंद गावडे यांनी प्रेक्षकांमधून केली घोडेस्वारी
Ithe Oshalala Mrutyu
Ithe Oshalala MrutyuDainik Gomantak

मांद्रे येथे ऐतिहासिक ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटक सादर करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी थेट प्रेक्षकांमधून घोडेस्वारी करत उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांनीही त्यांच्या या दमदार आमगनाला जल्लोषात प्रतिसाद दिला.

मांद्रे पंचायत क्षेत्रात प्रथमच उदरगत संस्था आणि आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्याने राज्य पातळीवरील चार दिवस भरगच्च शिगमोत्सवाचे आयोजन केले आहे.

Ithe Oshalala Mrutyu
खंडणी विषय बंद करणाऱ्यांना काहीतरी लपवायचे आहे : फेरेरा

पहिल्याच दिवशी ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे मंत्री गोविंद गावडे यांनी नाटक सुरू होण्यापूर्वी दमदार घोडेस्वारी करत पूर्ण मैदानाला दोन-चार वेळा फेरफटका मारला. हा अनुभव नाट्यरसिकांसाठी नवाच होता.

अनेक रसिकांना माहीत नव्हते, की छत्रपती संभाजी महाराज हे घोड्यावर बसून येणार आहेत. पण ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकूनही गेले. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मंत्री गोविंद गावडे हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत घोडेस्वारी करत होते, तेव्हा त्यांच्या सौभाग्यवती रिना गावडे यांना मोबाईलद्वारे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. या नाटकासाठी रंगभूषा अमिता आणि एकनाथ नाईक यांनी केली.

Ithe Oshalala Mrutyu
पालिकेला अवैध व्यावसायिकांचा विळखा; प्रशासनाची डोळेझाक

अन्य कलाकारांच्या भूमिका उत्कृष्ट

या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला ज्या पद्धतीने मंत्री गावडे यांनी न्याय दिला, त्याच पद्धतीने गणोजी शिर्के यांच्या भूमिकेला प्रशांत वझे यांनी न्याय देण्याचा जोरदार प्रयत्न केला. येसूबाईच्या भूमिकेत नम्रता नाईक यांनी उत्कृष्ट कला सादर केली. इतर सहकलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

मंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

नाटक संपल्यानंतर अनेक नाट्य रसिकांनी थेट रंगमंचावर धाव घेऊन मंत्री गावडे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यासोबत काहीजणांनी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी केली. आपण मंत्री आहोत हे विसरून गावडे यांनीही एक नाट्यकलाकार या नात्याने नाट्यप्रेमींची निखळ मनाने भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com