Goa ITI प्रवेश प्रक्रिया 26 जुलैपासून मार्गी लागणार
Goa ITIDainik Gomantak

Goa ITI प्रवेश प्रक्रिया 26 जुलैपासून मार्गी लागणार

Goa ITI प्रक्रिया ऑनलाईन असेल आणि ती ‘गोवा ऑनलाईन’वर राबविण्यात येईल,

पणजी : दहावी परीक्षेचा (10th Result) निकाल जाहीर झाल्‍याने आता आयटीआय (Goa ITI) केंद्रांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया मार्गी लागणार आहे. ही प्रक्रिया 26 जुलैपासून सुरु होणार असल्याची माहिती कौशल्य विकास खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी दिली. ही प्रक्रिया ऑनलाईन (Online) असेल आणि ती ‘गोवा ऑनलाईन’वर राबविण्यात येईल, असेही त्‍यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (ITI admission process in Goa will start from July 26)

Goa ITI
Goa: सेंट ॲना सायबिणीचे फेस्‍त एक ऑगस्टला

प्रमाणपत्रासाठी शिक्षण न घेता प्रत्यक्ष जीवनात व्‍यवसायाची अंमलबजावणी करून त्याद्वारे रोजगार मिळेल व स्वयंरोजगारही सुरू करता येईल असे शिक्षण घ्यायला हवे. ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने आयटीआय हा उत्तम पर्याय आहे. आज राज्यात इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर आदींची उणीव भासत असून परप्रांतीय लोकांवर आम्हांला अवलंबून राहावे लागत आहे. आज घराघरांत विविध उपकरणे असून लहानसहान कामांसाठी इलेक्ट्रिशियन, प्लंबर आदी तंत्रज्ञांची गरज भासत असते. पण ते उपलब्ध होत नाहीत याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.

Goa ITI
Goa: सरकारचे बेकायदेशीर खाण उद्योगाला प्राधान्य,विजय सरदेसाईंचा गंभीर आरोप

त्याशिवाय आयटीआय शिक्षण पूर्ण केलेल्यांना ॲप्रेंटिस म्हणून घेण्यासाठी अनेक कंपन्या संपर्क साधत असतात, ते त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे पदवी शिक्षण घेऊन बेकार राहण्यापेक्षा किंवा सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत राहण्यापेक्षा गोमंतकीय युवकांनी आयटीआयची संधी घ्यायला हवी, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com