IVERMECTIN घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ? वाचा सविस्तर

ivermectin scam.jpg
ivermectin scam.jpg

पणजी: सरकारने प्रोफेलिक्सिस उपचारासाठी आयव्हर्मेक्टिन गोळ्यांची खरेदी खासगी औषधे पुरवठादारांकडून दामदुप्पट किमतीने केली आहे. गोवा अँटिबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लि.ने (GAPL) आयव्हर्मेक्टिन गोळीची किंमत 2.79 रुपये नमूद केली असताना इतर चार खासगी औषध पुरवठादारांनी तीच गोळी 10 ते 12 पटीने जास्त किमतीने सरकारला विकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘गोमन्तक’ने माहिती हक्क कायद्याखाली (RTI) ही माहिती मिळवली आहे. त्यामुळे आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत असून, ही रक्कम दीड कोटींंच्या आसपास असू शकते.  ( How did the ivermectin scandal happen?)

औषधे भरमसाट किमतीने 
गोवा अँटिबायोटिक्सकडून 2.79 रुपये किमतीने आयव्हर्मेक्टिनच्या गोळ्या खरेदी केल्यानंतर खासगी औषधे पुरवठादारांकडून भरमसाट किमतीने ती खरेदी करण्यात आली आहेत. या गोळ्यांचा पुरवठा खासगी औषध पुरवठादारांनी सरकारला केला आहे. त्याची रक्कम देण्यासंदर्भातची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती हक्क कायद्याअंतर्गत नमूद करण्यात आले आहे. गोवा अँटिबायोटिक्सने 2.79 रुपये प्रति गोळीप्रमाणे आयव्हर्मेक्टिनचा पुरवठा केला असताना इतर खासगी औषधे पुरवठादारांकडून भरमसाट किमतीने सरकारने घेतल्याने त्याबाबत संशय निर्माण होत आहे. 

...म्हणून गोळ्यांच्या वाटपाचा प्रस्ताव रद्द
जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या वितरणास मान्यता दिली नव्हती. त्यामुळे हा विषय जनहित याचिकेत सुनावणीवेळी उच्च न्यायालयासमोर आला होता. त्यावेळी प्रोफेलिक्सिस उपचाराखाली हे वितरण करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून सरकारला ठणकावून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. ‘आयसीएमआर’ व तज्ज्ञ समितीने दिलेल्या मान्यतेनुसार गोळ्या कोरोना संसर्ग रुग्णांना प्रतिबंधक म्हणून देण्यात आल्या होत्या. मात्र त्या प्रोफेलिक्सिस उपचाराखाली नव्हेत, असे स्पष्टीकरण सरकारने दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com