‘आयव्हरमेक्टीन’ गोळ्या वितरण करणारे देशातील पहिले राज्‍य गोवा

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

गोव्यातील 18 वर्षे झालेल्‍या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात सध्या उशीर  होत असल्यामुळे त्याऐवजी आयव्हरमेक्टीन या गोळ्या देण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ही माहिती दिली. 
 

पणजी : राज्यातील(Goa) 18 वर्षे(18th+) झालेल्‍या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात सध्या उशीर  होत असल्यामुळे त्याऐवजी आयव्हरमेक्टीन(Ivermectin) या गोळ्या देण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे(Vishavajit Rane) यांनी काल ही माहिती दिली. अठरा वर्षांवरील सर्वांना पाच दिवस घेण्यासाठी आयव्हरमेक्टीन या 12 मिलीग्रॅमच्या कोरोना रोग प्रतिबंधक गोळ्या(Tablets) देण्यात येणार आहेत.(Ivermectin tablets will be given to everyone above 18 years of age In Goa) 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉक्टरांचे पथक व इतरांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे, तालुका इस्पितळे, सामाजिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर आरोग्य केंद्रांमध्ये या गोळ्या उद्यापासून उपलब्ध करण्यात येणार असल्‍याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. या गोळ्या कोविड प्रतिबंधक इंजेक्शन एवढ्या परिणामकारक नसल्या तरी कोविड प्रतिबंधक शक्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांनी घ्याव्यात, असे आवाहन आरोग्‍यमंत्र्यांनी केले आहे. 

आरोपांमध्ये तथ्य नाही!

आपल्यावर व्‍हेंटिंलेटर घोटाळ्याचा जो आरोप करण्यात आलेला आहे, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. प्रसिद्धीसाठी केलेला तो एक खटाटोप आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज दिले. पत्रकारांनी  याबाबत विचारले असता  राणे म्हणाले की, राज्यात आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. 

आपने सुरु केलेल्या ऑक्सिमीटर सेवेला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

आपण आरोग्यमंत्री झाल्यानंतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यसुविधा निर्माण केल्या. वाळपई, साखळी, डिचोली यासारखी अनेक इस्पितळे बांधली. आपले कार्य हे लोकांना चांगल्यात चांगले आरोग्य उपचार मिळावेत त्यासाठी आहे. त्यामुळे कोणी आरोप करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करूनच आपण आपले काम चालूच ठेवत आहे. सध्याचा काळ हा कोरोना संकटाचा आहे आणि अशावेळी आरोपांकडे लक्ष देऊन आपल्या कामावर परिणाम करून घेण्याचा आपला कुठलाही विचार नाही. लोकांचे प्राण वाचवणे आणि कोरोनाबाधित होण्यापासून लोकांना वाचवणे, त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील आपले सरकार काम करत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गोळ्या वितरण करणारे देशातील पहिले राज्‍य
इटली , युके,  जपान, स्पेन येथील तज्‍ज्ञांनी या गोळ्यांच्या उपचाराची शिफारस केलेले आहे. या गोळ्या वाटप करणारे गोवा हे  देशातील पहिले राज्य असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयव्हरमेक्टीन या गोळ्या सलग पाच दिवस घ्यायच्या आहेत आणि त्या सरकारच्या सर्व इस्पितळांमध्ये उद्यापासून उपलब्ध होणार असून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल तेव्हा मिळेल, त्यापूर्वी त्यांनी या गोळ्या घ्याव्यात.

गोव्यात तालुकावार कोविड उपचार केंद्रे 

तसेच ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतलेली आहे,  त्यांनीही या गोळ्या घेण्यास हरकत नाही, असेही अारोग्‍यमंत्र्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले. राज्यातील ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसतात त्यानी तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल येण्यास उशीर होत आहे, त्यामुळे त्यांना अहवाल येण्यापूर्वी तपासणीसाठी येताच प्राथमिक कोरोना विरोधी औषधांचे वितरण सुरू करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या