भाजपाची रणनिती आखण्यासाठी जे. पी. नड्डा गोव्यात

वाळपई येथे भाजप कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क अभियानाच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील.
भाजपाची रणनिती आखण्यासाठी जे. पी. नड्डा गोव्यात
J P Nadda to review election in GoaDainik Gomantak

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिल्याने भाजपने आपली निवडणूक यंत्रणा सक्रिय केली आहे. या निवडणूक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज संध्याकाळी गोव्यात पोहचतील. त्यांच्यासोबत निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी असणार आहेत.

त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्यासह पक्षाचे कार्यकारी मंडळ आणि कोअर कमिटीबरोबर मतदारसंघांनुसार आढावा घेतील. गुरुवारी सकाळी त्यांचा दौरा पणजीतील महालक्ष्मी देवीच्या दर्शनाने होणार असून अकरा वाजता वाळपई येथे भाजप कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क अभियानाच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com