
Jagannath Yatra in Goa : आपल्या भारत देशात अनेक सण आणि यंत्रांची अगदी वर्षभर मांदियाळी असते. नुकतीच ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथाची रथयात्रा सुरू झाली आहे. यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान यात्रेचा जल्लोष गोव्यातही दिसून आला. गोव्यातील मिरामार जवळील जगन्नाथाच्या मंदिरापासून नागरिकांनी अतिशय भक्तिभावाने आणि वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली.
ही पदयात्रा मिरामार येथील मंदिरापासून निघाली ती पुढे पणजी फेरी बोटपर्यंत चालली. लोकांनी अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात ही पदयात्रा पूर्ण केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील उपस्थित राहून जगन्नाथाचे दर्शन घेत आपला सहभाग दर्शवला.
दरम्यान, पुरीमध्ये कोरोनाच्या काळात या रथयात्रेत प्रथमच भाविकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 1 जुलै ते 12 जुलैपर्यंत चालणाऱ्या या रथयात्रेत लाखो भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये मंगला आरती केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.