जगदीश भोबे यांचा गोवा फॉरवर्डला रामराम, तृणमूल पक्षात सामील

सांत आंद्रे या मतदारसंघात काँग्रेसने स्वतःचा उमेदवार जाहीर केल्यानंतर गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) जगदीश भोबे यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा दिला.
जगदीश भोबे यांचा गोवा फॉरवर्डला रामराम, तृणमूल पक्षात सामील
Jagdish BhobeDainik Gomantak

मडगाव: सांत आंद्रे या मतदारसंघात काँग्रेसने स्वतःचा उमेदवार जाहीर केल्यानंतर गोवा फॉरवर्डचे जगदीश भोबे यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा दिला. भोबे यांनी आपल्या समर्थकांसह तृणमुल पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या समर्थकांसह त्यांनी तृणमुल पक्षात प्रवेश केला. तृणमुलच्या गोवा प्रभारी महुवा मोईत्रा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझींन फालेरो उपस्थित होते.

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती झाली असून सांत आंद्रे मतदारसंघावर गोवा फॉरवर्डने दावा केला होता. मात्र काँग्रेसने तिथे स्वतःचा उमेदवार उभा करण्याचे ठरविले आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर गोवा फॉरवर्डने नापसंती व्यक्त केली आहे.

Jagdish Bhobe
Goa Elections 2022: आप उद्या गोव्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणार जाहीर

यावेळी बोलताना भोबे म्हणाले, काँग्रेसने जो उमेदवार आता उभा केला आहे तो मागची 10 वर्षे भाजपसाठी काम करायचा. 2017 साली काँग्रेसचा जो उमेदवार निवडून आला तो 2 वर्षातच फुटून भाजपात गेला. तर आता निवडून येण्यापूर्वीच काँग्रेसचा हा नवीन उमेदवार फुटला आहे. काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही. अशा परिस्थितीत तृणमुल हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा त्यांनी केला.

लुईझींन फालेरो यांनी सध्या गोव्यात भाजपला तृणमुल हा एकमेव पर्याय असून त्यामुळेच भोबे सारखे नेते या पक्षात सामील होत आहेत. भोबे यांनी सांत आंद्रेतून निवडणूक लढवली तर ते निश्चित निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मोईत्रा यांनी भोबे यांच्या आगमनाने तृणमुल सांत आंद्रेत अधिक मजबूत झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.